पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) कामानिमित्त गेलेल्या नागरिकांची कामे दलालांशिवाय मार्गी लागत नाहीत, असा सामान्यांचा अनुभव आहे. आरटीओ कार्यालयात दलालांचा (एजंट) सुळसुळाट झाला असून एका दलालाने वाहनाची कागदपत्रे आरटीओ निरीक्षकाच्या अंगावर फेकून मारहाण केल्याची घटना विश्रांतवाडी भागातील फुलेनगर आरटीओ कार्यालयात घडली. याबाबत मोटार वाहन निरीक्षक अभिजित गायकवाड (वय ३५) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी निकी फ्रान्सीस स्वामीनाथन (वय ३८, रा. आदर्श इंदिरानगर, आळंदी रस्ता, फुलेनगर) याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन निरीक्षक अभिजीत गायकवाड फुलेनगर येथील कार्यालयात होते. त्या वेळी दलाल स्वामीनाथन गायकवाड यांच्या कार्यालयात आला आणि ‘ए गायकवाड, या कागदपत्रांवर सही करुन दे’, असे सांगून शिवीगाळ केली. ‘गायकवाड सही कर नाही तर घरी येऊन जीवे मारुन टाकीन’,अशी धमकी देऊन त्याने गायकवाड यांना मारहाण केली. कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी स्वामीनाथने अरेरावी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करुन सगळ्यांना अडकवेल, अशी धमकी देऊन स्वामीनाथन पसार झाला. गायकवाड यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. शासकीय कामात अडथळा तसेच धमकावल्या प्रकरणी दलाल स्वामीनाथन याला अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
Kolhapur jobs 2024 Jilhadhikari Karyalay hiring
Kolhapur jobs 2024 : कोल्हापूरकरांनो, जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची संधी! अधिक माहिती पाहा
Two Drunk Policemen, Vandalize Hotel, Assault Owner, hudkeshwar police station, crime, marathi news,
मद्यधुंद पोलिसांची भोजनालयात तोडफोड, चित्रफीत प्रसारित झाल्याने खळबळ