विद्यार्थ्यांना निकाल लघुसंदेशाद्वारे कळवण्याचे निर्देश

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी परिपत्रकाद्वारे कळवले.

प्रतिकात्मक

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर  राज्यातील इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा शैक्षणिक वर्ष त्यांचा 2019-20 चा निकाल लघुसंदेश, दूरध्वनी आणि ऑनलाईन पद्धतीने कळवावा,  जेणेकरून विद्यार्थांमध्ये कोणताही संभ्रम होणार नाही व त्यांना पुढील शैक्षणिक वर्षाचा अभ्या करणे उपलब्ध साहित्याच्या आधारे सुरू करणे शक्य होईल, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

स्थानिक लॉकडाउनच्या परिस्थितीनुसार पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्याअगोदर विद्यार्थांना निकालपत्र देण्यासाठीची आवश्यक कार्यवाही शाळा, महाविद्यलयांनी करावी असे देखील सांगण्यात आले आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Instruct results to students via sms msr

ताज्या बातम्या