बहिणीने आंतरधर्मीय विवाह केल्याचा राग मनात धरून मेहुण्याने बहिणीच्या पतीची हत्या केल्याचं उजेडात आलं आहे. यात दुसरा मेहुणा आणि चुलत भाऊ सहभागी असल्याचं देखील उजेडात आलं आहे. कट रचणारा सुशांत गोपाळ गायकवाड, गणेश गायकवाड आणि पंकज विश्वनाथ पाईकराव पैकी दोघांना पिंपरी- चिंचवडच्या भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. अमीर मोहम्मद शेख हत्या झालेल्या व्यक्तीच नाव आहे. अमीर ने सुशांत च्या बहिणीशी आंतरधर्मीय विवाह केला होता. जो गायकवाड कुटुंबाला मान्य नव्हता. हाच राग मनात ठेवून सुशांत ने दुसऱ्या बहिणीच्या नवऱ्याला हाताशी धरून मेहुण्याची हत्या केली आहे. हेही वाचा >>> भरधाव मोटारीने हवालदाराला चिरडणाऱ्या मोटारचालकाने मद्यप्राशन केल्याचे निष्पण्ण; वाढदिवसाची पार्टी करणारे आणखी दोघे अटकेत सविस्तर माहीती अशी की, अमीर मोहम्मद शेख आणि निकिताचे प्रेमसंबंध होते. दोघे ही एकाच गाव चे होते. त्यांच्या या प्रेमविवाह ला गायकवाड कुटुंबाची संमती नव्हती. कुटुंबाच्या विरोधात जाऊन दोघांनी आंतरधर्मीय विवाह केला. गावात राहिल्याने आणखी वाद उदभवू शकतो. हे लक्ष्यात घेऊन ते पुण्यात आले. पाच- सहा महिन्यांपासून दोघे ही पुण्यातील मोशी येथे सुखी संसार करत होते. याच दरम्यान, निकिता उर्फ अरीना हिच्या बहिणीच्या पतीने अमीर सोबत जवळीक वाढवली. १५ जून रोजी अमीर शेख हा कंपनीत जातो म्हणून घराबाहेर पडला. तेव्हा, साडु पंकज पाईकराव ने त्याला मद्यपान करण्यास पुणे - नाशिक रोडवरील एका हॉटेल मध्ये बोलावलं. तिथं दोघे जण दारू प्यायले. अमीर हा कंपनीत जाण्यास निघाला तेव्हा पुन्हा त्याला दारू प्यायचा आग्रह हा सुशांत आणि गणेश गायकवाड यांनी केला. पुन्हा, हॉटेलमधील दारू नेऊन सर्व जण आळंदी- चाकण रस्त्या जवळील जंगलात बसून प्यायला लागले. सुशांत ने पंकज ला फोन करून बाजूला जाण्यास सांगितले. तो बाजूला गेल्यानंतर सुशांत आणि गणेश यांनी अमीर ला बेदम मारहाण केली. डोक्यात दगड घालून हत्या केली. हेही वाचा >>> घर घेताय…? जाणून घ्या पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये घरांच्या किमती किती महागल्या… बहिणी सोबत विवाह केल्याचा त्यांच्या डोक्यात राग होता. पुरावा नष्ट करण्याचा हेतूने मृतदेहावर डिझेन टाकून मृतदेह जाळण्यात आला. हाडे आणि राख हे गोणीत भरून नदीत टाकून देण्यात आली. पती येत नसल्याने अखेर पत्नी निकिता उर्फ अरीना ने भोसरी एमआयडीसी पोलिसात पती अमीर हा बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दुसरीकडे अमीर चे वडील मोहम्मद शेख यांनी त्याच अपहरण करून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. भिंगे आडगाव हिंगोली आणि लोणावळा येथून पंकज आणि सुशांत ला अटक करण्यात आली. तर, गणेश गायकवाड हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, मृतदेह जाळण्यासाठी डिझेल देणाऱ्या व्यक्तीला ही अटक करण्यात आली आहे. हा सर्व कट निकिता उर्फ अरीना चा भाऊ सुशांत ने रचल्याचं पोलीस तपासात उघड झाले आहे.