काँग्रेसच्या ‘हाथ से हाथ जोडो’ मोहिमेच्या निमित्ताने पक्षातील गटबाजी पुन्हा पुढे आली आहे. प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सोमवारपासून पुण्यातून सुरू होणाऱ्या मोहिमेच्या नियोजनासंदर्भात आयोजित बैठकीला प्रदेश स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. मोहिमेची सुरुवात कोठून करायची, यावरूनही काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने प्रांताध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे, तसेच विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘हात से हात जोडो’ या राज्यस्तरीय मोहिमेचा प्रारंभ गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथून होणार आहे. त्यासाठीच्या नियोजन बैठकीकडे प्रदेश स्तरावरील काही पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे, मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोहिमेचे नियोजन करण्यात आले. प्रदेशाध्यक्षांनी कोणत्या प्रभागात जायचे, यावरून वादावादी झाल्याचे काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”

हेही वाचा – पुणे : मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार, पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू

हेही वाचा – “धरणात लघुशंका करणारे आता इतिहासात लघुशंका करायला लागले”, हिंदू राष्ट्रसेना प्रमुख धनंजय देसाईंची अजित पवारांवर टीका

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेतून दिला गेलेला संदेश अधिक बळकट करण्यासाठी संपूर्ण राज्यात ही मोहीम राबविली जाणार आहे. मोहिमेत प्रत्येक प्रभागातील घराघरांत काँग्रेसचा विचार, ध्येयधोरणे, भारत जोडो यात्रेची उद्दिष्ट पोहचविण्यात येणार आहे. त्यासाठी नेते आपापल्या भागात स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.