पुणे :मोशीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन केंद्र आहे. या केंद्राच्या सर्व बाजूंच्या सीमाभिंतीलगत कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रदर्शन केंद्राच्या पूर्व बाजूस पुणे-नाशिक महामार्ग असून, सीमाभिंतीलगत मोठ्या प्रमाणात कचरा आणि राडारोडा आणून टाकला जात आहे. जवळच असणाऱ्या उपबाजार समितीतून खराब झालेला भाजीपाला काही विक्रेते टेम्पोमधून येथे आणून टाकत आहेत. या परिसरात अनेक बांधकामे सुरू असून त्याचा राडारोडादेखील याच ठिकाणी आणून टाकला जात आहे. यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना शहराच्या अस्वच्छतेचे दर्शन घडत आहे. अशीच परिस्थिती उत्तर बाजूच्या सीमाभिंतीलगत आहे. या ठिकाणीदेखील वेगवेगळ्या प्रकारचा कचरा आणून टाकला जात आहे. यात भर म्हणून पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात येणारे वाहनचालकही कचरा रस्त्यावर टाकत आहेत. यामुळे येथील नागरिक हैराण आहेत.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी कचऱ्याचे ढीग

vasai naigaon marathi news
वसई : दहा वर्षांपासून नायगाव खाडी पुलाचे काम अपूर्णच, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कामकाज ठप्प
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
ISKCON temple kharghar history
नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन… इस्कॉनचा इतिहास काय? ही संस्था कशी चालविली जाते?
z morch tunnel
सामरिक महत्त्व असलेल्या ‘झेड मोढ’ बोगद्याचं पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन; याचे वैशिष्ट्य आणि फायदे काय?
security beefed up around z morh tunnel
‘झेड मोढ’ बोगद्याभोवती सुरक्षा व्यवस्थेत वाढ; पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या उद्घाटनाची शक्यता
Committee to investigate Eklavya School case takes note of student protest
एकलव्य शाळेतील प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती, विद्यार्थी आंदोलनाची दखल
Sambhal Jama mosque
संभल येथील जामा मशिद परिसरातील विहिरीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मंदिर की मशिदीला मिळणार पाणी?
fully equipped tourist attraction in Gondia Vidarbha
नवेगावबांधमध्ये पर्यटकांसाठी सूसज्ज निवास व्यवस्था ; या आहेत सुविधा

या प्रदर्शन केंद्राची सीमाभिंत आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यामधून जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी कचरा उघड्यावरच टाकला जात आहे. या रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी येथील नागरिक चालण्यासाठी येत असतात. मात्र, येथील पदपथावर झुडपे, गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पदपथावरील पेव्हिंग ब्लॉक निघालेले आहेत. यामुळे नागरिकांना सेवा रस्त्यावरून चालावे लागत आहे.

हेही वाचा…पुण्याच्या पाण्याचे नियंत्रण जाणार जलसंपदा विभागाच्या ताब्यात? नक्की काय आहे कारण !

परिसरात दुर्गंधी

औद्योगिक क्षेत्र जवळच असल्याने अनेक कामगार पायी ये-जा करत असतात. त्यांना या कचऱ्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. जवळच अनेक गृहप्रकल्पही उभारले जात आहेत. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

नागरिक काय म्हणतात?

प्रदर्शन केंद्राच्या उत्तर बाजूस महापालिकेकडून अर्बन स्ट्रीट अंतर्गत कोट्यवधी रुपयांचे काम सुरू आहे. असे असताना इतर तीन बाजूंच्या स्वच्छतेबाबत आणि सोयीसुविधांबाबत महापालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप दत्तात्रय आल्हाट यांनी केला. गरज कचरा उघड्यावर टाकणाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात यावी. या रस्त्यांच्या पदपथाच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी गणेश आल्हाट यांनी केली.

हेही वाचा…महापालिका आयुक्तांचा आदेश आणि पहिल्याच दिवशी झाले इतके काम ! महापालिकेची सर्वंकष स्वच्छता मोहीम, १६ टन राडारोडा, २४ टन कचराही उचलला

प्रशासनाचे म्हणणे काय?

महापालिकेच्या वतीने दररोज येथील कचरा उचलला जातो. मोठा परिसर व मोकळी जागा असल्याने नागरिक कचरा आणून टाकतात. कचरा समस्येबाबत परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे सहायक आरोग्य अधिकारी तानाजी दाते यांनी सांगितले.

Story img Loader