पुणे : शहरातील एका पोलाद व्यावसायिकाच्या चौकशी प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजीर शेख यांची नियंत्रण कक्षात बदली करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले.पोलाद व्यावसायिकाच्या चौकशीबाबत प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले होते. चौकशीत काही संशयास्पद बाबी आढळून आल्याने तातडीने बदलीची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती.

शहरातील एका पोलाद व्यावसायिकाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजीर शेख यांच्याकडे होती. या प्रकरणाची चौकशी प्रामाणिक अधिकाऱ्याकडून करण्यात यावी, अशी विनंती बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. वजीर शेख यांच्याकडून तपास काढून घ्यावा, असे कडू यांनी पत्रात म्हटले होते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले. पोलीस आयुक्त गुप्ता यांनी वजीर शेख यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्याचे आदेश दिले.

Property worth 113 crores seized by ED in case of builder Tekchandani
बांधकाम व्यावसायिक टेकचंदानी प्रकरणी ११३ कोटींच्या मालमत्तेवर टाच, ईडीची कारवाई
The nine judge bench of the Supreme Court
सर्वोच्च न्यायालयाचे नऊ न्यायाधीशांचे खंडपीठ कोणत्या प्रकरणांवर सुनावणी करणार?
Upsc Preparation Legislature Judiciary in Indian Polity Paper of Civil Services Pre Exam
upsc ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था; कायदेमंडळ, न्यायमंडळ, पंचायती राज
rape at juhu chowpatty marathi news, high court
भरदिवसा जुहू चौपाटीवर बलात्कार करणे अविश्वनीय, आरोपीला जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण