पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पैसे वाटप करण्याच्या ध्वनिचित्रफीतीत पोलीस अधिकाऱ्याची उपस्थितीचा प्रकार महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पोटनिवडणुकीत मतदारांना पैसे वाटण्याच्या तक्रारी करण्यात आल्या. प्रचार संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी (२५ फेब्रुवारी) काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी लाक्षणिक उपोषण केले. समाजमाध्यमावर पैसे वाटप करण्यात येत असल्याच्या दोन ते तीन ध्वनिचित्रफीत प्रसारित झाल्या आहेत. त्यापैकी एक ध्वनिचित्रफीत गंज पेठेतील असून, एका खोलीत पैशांचे वाटप सुरू असल्याचे दिसत आहे, पैसे वाटप करणाऱ्याला नागरिकांनी पकडून ठेवले असल्याचे दृश्य ध्वनिचित्रफीतीत आहे.

aap party leader aatishi
‘आप’च्या नेत्या आतिशी यांना नोटीस; भाजपवर केलेल्या आरोपांबाबत उत्तर देण्याचे निर्देश
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ
ठाण्यासाठी शिंदे गटाच्या जोर-बैठका; मतदारसंघात उमेदवारीसाठी कार्यकर्ते आग्रही ; भाजपाला जागा जाण्याच्या चर्चेने अस्वस्थता
bombay hc decision on petition filed by congress mla ravindra dhangekar over Development works in Kasba Constituency pune news
उच्च न्यायालयाच्या निकालानंतरही कसब्याच्या वाट्याला ‘भोपळा’च?

हेही वाचा – चिंचवड पोटनिवडणुकीसाठी ५०.४७ टक्के मतदान, अखेरच्या एका तासात तब्बल नऊ टक्के मतदान

हेही वाचा – भाजपाचे माजी नगरसेवक गणेश बीडकर यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप; कसब्यात भाजप- काँग्रेस कार्यकर्ते भिडले

रविवार पेठ परिसरातील एका इमारतीत पैशांचे वाटप केले जात असल्याची आणखी एक ध्वनिचित्रफीत प्रसारित झाली. कसबा पेठ भागात पैसे वाटप करण्यात आल्याची ध्वनिचित्रफीत प्रसारित झाली असून, पोलिसांनी या ध्वनिचित्रफीती निवडणूक आयोगाकडे पाठविल्या आहेत.