scorecardresearch

पुणे: नायडू रूग्णालयात गोवर आजारासाठी विलगीकरण कक्ष; ५० खाटांची सुविधा

गोवर प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत महापालिकेने डॉ. नायडू सांसर्गिक रोग रुग्णालयात विलगीकरण कक्ष कार्यान्वित केला आहे.

पुणे: नायडू रूग्णालयात गोवर आजारासाठी विलगीकरण कक्ष; ५० खाटांची सुविधा
डॉ. नायडू सांसर्गिक रोग रुग्णालय(संग्रहित छायचित्र)

गोवर प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत महापालिकेने डॉ. नायडू सांसर्गिक रोग रुग्णालयात विलगीकरण कक्ष कार्यान्वित केला आहे. या कक्षात ५० खाटांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार ही उपाय योजना करण्यात आली आहे.रुग्ण आढळल्यास ७ दिवसांच्या विलगीकरणासाठी ही सुविधा असेल.

हेही वाचा >>>पुणे: युवक काँग्रेसकडून राजभवनसमोर काळे झेंडे दाखवून आंदोलन; पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात

राज्यात भिवंडी, मुंबई आणि मालेगांव येथे गोवर आजाराची साथ आढळून आली आहे. त्या दृष्टीने महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. बालकांना ताप, सर्दी, खोकला येणे, घशात दुखणे, अंग दुखणे, अशक्तपणा, लाल रंगाचे पुरळ येणे, डोळे लाल होणे, तोंडाच्या आतील बाजूस पांढऱ्या रंगाचे चट्टे अशी या आजाराची लक्षणे आहेत.शहरात गोवर आजाराचा एकही रुग्ण महापालिकेच्या आरोग्य विभागाला आढळून आलेला नाही. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संशयितांचे सर्वेक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने तपासणीसाठी दिलेले दीडशे अहवाल नकारात्मक आले असून येत्या काही दिवसांत साठ अहवाल महापालिकेला मिळणार आहेत.

हेही वाचा >>>पुणे : राज्यपालांनी व्यक्त केला पश्चात्ताप…. शिष्टमंडळ भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा

कसबा, धनकवडी, वारजे, भवानीपेठ अशा दाट लोकवस्तीच्या भागात सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्दी, खोकला, अंगावर पुरळ असलेल्या संशयित रुग्णांचे नमुने घेऊन राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. अद्याप एकही गोवरचा रुग्ण आढळून आला नाही. मात्र, महापालिका प्रशासन खबरदारीचा उपाय म्हणून तयारी करीत आहे. त्याअंतर्गत विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती सहाय्य आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.महापालिकेच्या सर्व दवाखाने आणि बाह्यरूग्ण विभागामध्ये गोवरची लस देण्यात येत आहे. ९ ते १६ महिने आणि १६ ते २४ महिन्यांच्या बालकांनी गोवरची मात्रा देण्यात येते. यासाठी महापालिका प्रशासनाकडे पुरेसा साठासुद्धा उपलब्ध आहे, असे डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 16:23 IST

संबंधित बातम्या