it company director in lonavala cheated for 10 lakh pune print news zws 70 | Loksatta

खोदकामात सोन्याची विट, हिरे सापडल्याची बतावणी ; माहिती-तंत्रज्ञान कंपनीच्या संचालकाची दहा लाखांची फसवणूक

याबाबत एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीच्या संचालकांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती

खोदकामात सोन्याची विट, हिरे सापडल्याची बतावणी ; माहिती-तंत्रज्ञान कंपनीच्या संचालकाची दहा लाखांची फसवणूक
प्रतिनिधिक छायाचित्र

लोणावळा : बंगळुरू येथे खोदकाम करताना सोन्याची विट आणि हिरे सापडल्याची बतावणी करुन एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीच्या संचालकाची दहा लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या पथकाने एकास अटक केली.

भीमा गुलशन सोलंकी (मूळ रा. बडोदा, गुजरात, सध्या रा. देहूरोड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीच्या संचालकांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार मुंबईत राहायला आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची लोणावळा परिसरात सोळंकी यांच्याशी भेट झाली होती. बंगळुरू येथे एक जुनी वास्तू पाडण्यात आली. तेथे मला सोन्याच्या विटा आणि हिरे असलेली पिशवी सापडली असल्याची बतावणी सोलंकीने त्यांच्याकडे केली होती.

हेही वाचा >>> पुणे : समाजमाध्यमावरील ओळखीतून तरुणाची आर्थिक फसवणूक ; वकिलाच्या विरोधात गुन्हा

सोन्याच्या विटा आणि दागिन्यांची विक्री करायची असल्याचे आमिष सोलंकीने त्यांना दाखविले होते. त्यानंतर त्यांच्याकडून दहा लाख रुपये सोलंकीने घेतले. त्या बदल्यात बनावट सोन्याची विट आणि हिरे देऊन सोलंकी पसार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस अधीक्षक डॅा. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस आयुक्त मितेश घट्टे यांनी आरोपीचा शोध घेण्याचे आदेश तपास पथकाला दिले. लोणावळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहायक निरीक्षक नेताजी गंधारे, सचिन रावळ, प्रकाश वाघमारे, हनुमंत पासलकर आदींनी सोलंकीला सापळा लावून ताब्यात घेतले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : जिल्ह्यातील ३१२६ मुलांना दृष्टीदोष ; राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शाळेय विद्यार्थ्यांची तपासणी

संबंधित बातम्या

राज्यपालांना काळे झेंडे दाखवणाऱ्या ‘स्वराज्य’ संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक, संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “शिवरायांचा…”
पुणे: दुचाकी टॅक्सी, ‘आरटीओ’त न्यायालयीन वाद
पुणे : राज्यपालांनी व्यक्त केला पश्चात्ताप…. शिष्टमंडळ भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा
मुंबई- पुणे महामार्गावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पुणे : पालखी सोहळ्यासाठी पीएमपीच्या जादा गाड्या

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई: नायर दंत रुग्णालयात उभारणार अद्ययावत प्रयोगशाळा
मुंबई: नवजात बालकाला इमारतीवरून फेकणाऱ्या महिलेला तीन वर्षांनी जामीन
राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा कार्यकर्त्यांना नव्हता थांगपत्ता; सिंधुदुर्ग जिल्ह्याची मनसे कार्यकारिणी बरखास्त
पुणे: शिवाजीनगर, डेक्कनमधील वीजपुरवठा रविवारी सकाळी बंद; महापारेषणकडून पूर्वनियोजित दुरुस्ती
रविवारच्या मेगाब्लाॅकमधून मुंबईकरांची सुटका; महापरिनिर्वाणदिनानिमित्त मेगाब्लाॅक नाही