पुणे : राज्यातील राजकीय संस्कृती हा एक चिंताजनक विषय झाला असून, सर्व पक्षाच्या लोकांनी यावर बसून काय बोलले पाहिजे काय नाही हे ठरविणे आवश्यक आहे. दिलगिरी व्यक्त केली की हा विषय संपला पाहिजे असं वाटते . जुन्या काळातील यादी बाहेर काढल्यास अब्दुल सत्तार यांचे समर्थन होईल. जे मला करायचे नाही. या सोबतच खोके या विषयावरून एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना टार्गेट करणे हे चुकीचे असून,मात्र या सत्ता समीकरणमध्ये अस काही झालेले नाही. असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

माझ्या गुरूने एक चूक करायला शिकवले आहे .मात्र एक चूक वारंवार घडत असेल तर ते चुकीच आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्याबाबत मुख्य नेते पाहतील काय करायचे ते. त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने राजीनाम्याची मागणी करू नये असे माझे अजिबात म्हणणे नाहीपण आता माफी मागितली असेल तर हा विषय संपवला पाहिजे असे चंद्रकांत पाटील म्हणाले.हर हर महादेव चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ज्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा टेंभा मिरवायचा असेल त्यांनी कायदा हातात घेणे योग्य नाही. कारण प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.

Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
Sharmistha Mukharjee and Arvind Kejriwal arrest
“कर्माची फळं…”, प्रणव मुखर्जींच्या मुलीचा केजरीवालांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, “अण्णा हजारे गँग…”
Sukesh Chandrashekhar and k kavitha
“अक्का, तिहारमध्ये तुमचं स्वागत!”, के.कविता यांच्या अटकेनंतर गँगस्टर सुकेश चंद्रशेखर याचं तुरुंगातूनच पत्र

हेही वाचा : उद्धव ठाकरे अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विळख्यात; उद्योगमंत्री उदय सामंत यांची टीका

राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा राज्यात पोहोचली असून त्याला आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. काँग्रेसने राहुल गांधी यांना १३ ते १४ वेळा अशा प्रकारे प्रमोट करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र काँग्रेसला यामध्ये काही यश आले नाही आणि त्यांच्या खासदारांची संख्या काही ५० ते ६० च्या वर जात नाही.