शाळा सुरू करण्याबाबत विरोध अशास्त्रीय!

राज्य कृती दलाच्या भूमिकेवर जनआरोग्य अभियानची नाराजी

(संग्रहीत)

राज्य कृती दलाच्या भूमिकेवर जनआरोग्य अभियानची नाराजी

पुणे : राज्यातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या कृती दलाची शाळा सुरू न करण्याची भूमिका अशास्त्रीय असून शाळा बंद असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच, त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडले आहे. पोषण आहारापासून वंचित राहिलेल्या अनेक मुलांमध्ये कु पोषण आणि पर्यायाने क्षयरोगाचा धोका आहे. त्यामुळेच पूर्वतयारी आणि योग्य नियोजन करून शाळा सुरू कराव्या, असे आवाहन जनआरोग्य अभियानतर्फे  करण्यात आले आहे.

शाळा सुरू करणे किं वा न करणे यांसारखे निर्णय हे सार्वजनिक आरोग्यशास्त्राच्या आधारे घेतले जाणे आवश्यक आहे. त्यातील तज्ज्ञ कृती दलामध्ये नाही. त्या विषयातील तज्ज्ञाचा समावेश करून त्यानंतर शाळा सुरू करण्याबाबतची भूमिका कृती दलाने घ्यावी, असे जनआरोग्य अभियानने म्हटले आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतरचे चित्र पाहता सध्याच्या स्थितीत ७० टक्के पेक्षा अधिक लोकसंख्येकडे करोनाविरोधी प्रतिकारशक्ती आहे. ८० टक्के  प्रतिकारशक्ती आली की समूह प्रतिकारशक्ती येऊन साथ ओसरते किं वा संपते असे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे करोना संसर्गाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेएवढी गंभीर असण्याची शक्यता नाही. लहान मुलांना करोनानंतर मल्टिसिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम हा गंभीर आजार होण्याची शक्यता असते, मात्र हे प्रमाण अत्यल्प आहे. हा धोका टाळण्यासाठी मधुमेह, जास्त वजन, गंभीर आजारांची पार्श्वभूमी असलेल्या मुलांना शाळेत न पाठवण्याचा पर्याय पालकांकडे आहे. याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटना किं वा बालरोगतज्ज्ञांनी मुलांचे लसीकरण ही शाळा उघडण्याची अट ठेवलेली नाही. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे प्रमुख बलराम भार्गव यांनीही योग्य पूर्वतयारी आणि नियोजन करून शाळा उघडाव्यात असे म्हटले आहे. संसर्गाचा दर पाच टक्के पेक्षा कमी असल्यास, दर एक लाख नागरिकांमागे २० पेक्षा कमी नवे रुग्ण असल्यास जिल्ह्य़ातील शाळा सुरू कराव्यात, असे भारतातील बालआरोग्यतज्ज्ञांनी स्पष्ट के ले आहे. त्यामुळे योग्य पूर्वतयारी आणि नियोजन करून अंगणवाडय़ा आणि शाळा लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी जनआरोग्य अभियानने के ली आहे.

शाळा सुरू करताना शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण के ले जावे. हवेतील सूक्ष्म कणांमार्फत (एरोसोल) मुलांना करोना संसर्ग होणे शक्य असल्याने निर्जंतुकीकरणाचा उपयोग नाही. तसेच, मुलांना संसर्ग झाल्यास त्याचे खापर मुख्याध्यापक किं वा शिक्षकांवर फोडू नये, असेही जनआरोग्य अभियानने स्पष्ट के ले आहे.

फरक पडणार नाही..

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने जुलैअखेर के लेल्या सीरो सर्वेक्षणात देशातील तब्बल ६७ टक्के  नागरिकांना करोना संसर्ग होऊन गेल्याचे स्पष्ट झाले आहे. यांमध्ये सहा वर्षांवरील मुलांचे प्रमाणही लक्षणीय आहे. शाळा बंद असूनही त्यात कोणताही फरक नाही. मग शाळा बंद ठेवण्याचे कारण काय, असा प्रश्न जनआरोग्य अभियानकडून उपस्थित करण्यात आला आहे.

शाळा सुरू करणे आता अत्यावश्यक – डॉ. साळुंखे

शाळा बंद असल्याने मुलांमधील संसर्गात घट झाल्याचे कोठेही दिसत नाही. आता सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे पालकांसह मुले सहली, खरेदीची ठिकाणे, मॉल, उपाहारगृह अशा सर्व ठिकाणी जात आहेत. असे असताना के वळ शाळा बंद ठेवण्याने संसर्गाचा धोका टळणार आहे या म्हणण्याला अर्थ नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्याशी चर्चा के ली आहे. ग्रामीण भागापासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने शहरातील शाळा सुरू करण्याला प्राधान्य द्यावे, असे मत राज्याचे करोनाविषयक तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jan arogya abhiyan appeals to start school with proper planning zws

ताज्या बातम्या