Jay Pawar clarification Revati Sule wedding Dance: खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचे गेल्या काही दिवसांपूर्वी लग्न झाले. रेवती यांच्या लग्नात सर्व पवार कुटुंबीय आनंदाने सहभागी झाल्याचे दिसून आले. लग्नसमारंभात दिवंगत अजित पवार यांचे पुत्र जय पवारांनी नृत्य केले होते. यावर काहींनी प्रश्न उपस्थित केल्याचे सांगत याबाबतचे स्पष्टीकरण जय पवारांनी बारामतीत एका कार्यक्रमात बोलताना दिले.
आज मला उत्तर द्यायचंय – जय पवार
“सुप्रिया ताईंच्या मुलीचे लग्न झाले, तिथे मी दोन डान्स स्टेप केल्या तर त्या व्हिडीओवर लोक काहीही चुकीचं बोलायला लागले. मला त्यांना आज उत्तर द्यायचंय”, असे म्हणत जय पवारांनी त्यांच्या लग्नासाठी पाच-सहा महिने उरले असताना भारती पवार यांच्या निधनाचा उल्लेख करत एक प्रसंग सांगितला. बारामतीत आयोजित कृतज्ञता स्नेहमेळाव्यात जय पवार बोलत होते.
जय पवार काय म्हणाले?
“भारती आजीचे निधन झाले त्यावेळी प्रताप आजोबांनी असं ठरवलं होतं की, हे बघ अजित जरी हा दु:खद प्रसंग घडला असला तरी आपण सर्व एक कुटुंब आहोत, सर्वांना एकत्र घेऊन हे लग्न पार पडेल. माझ्या लग्नात देखील अजितदादांनी याचा उल्लेख केला होता की राजकारण बाजुला राहिलं, कुटुंब म्हणून एकत्र राहायचं. भविष्यात देखील दुर्दैवाने काय झालं तरी आपण कुटुंबाच्या लग्नात थोडंफार तरी सहभागी व्हायला पाहिजे, त्या कमेंट्सचा माझ्यावर काय परिणाम होत नाही, पवार कुटुंबावर काय परिणाम होत नाही”, असे जय पवारांनी स्पष्ट केले.
अजित पवारांशी शेवटची भेट आणि अर्थखात्याबाबत सूचक वक्तव्य
जय पवारांनी यावेळी अजित पवार यांच्याशी २६ तारखेला शेवटची भेट झाल्याचे सांगितले. “२८ तारखेला आपल्या सर्वांचेच जीवन बदलले, पण माझं, सुनेत्रा वहिणी आणि पार्थ दादा यांचे जीवन फारच वेगाने बदललं. जबाबदारी किती वाढल्या, आम्हाला केव्हा वाटलं नाही की इथं सारखं येऊन तुम्हाबरोबर राहावं लागेल, पण सर्वांमध्ये ती पोकळी दिसली सर्वांना आधाराची गरज वाटली त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातील जनतेसाठी ठामपणे झटण्याचा निर्णय घेतला”, असे पार्थ पवार म्हणाले. पार्थ पवारांनी यावेळी अर्थखातं राष्ट्रवादी (अजित पवार) कडे सोपवले जाणार असल्याचेही सूचक वक्तव्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याबाबत भाष्य केल्याचे जय पवार बारमतीत बोलताना म्हणाले.
