ज्य सरकार दुसऱ्याच गोष्टींमध्ये व्यग्र आहे. त्यांचे कशावरही नियंत्रण राहिलेले नाही. म्हणूनच पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्याचे धाडस होऊ शकले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पिंपरीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. भाजपाने राष्ट्रवादीची धास्ती घेतली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीला ‘टार्गेट’ करण्यात येत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

हेही वाचा- केळींच्या निर्यातीत सोलापूरची आघाडी ; उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात बहरले मळे; उसापेक्षा जास्त उत्पन्न

पुण्यातील पाकिस्तान जिंदाबाद घोषणेवरुन टीका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यनोंदणीचा आढावा घेण्यासाठी पाटील शहरात आले होते. यावेळी काळेवाडीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पाटील म्हणाले की, पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा जर पुण्यात देण्यात आल्या असतील, तर ही अतिशय गंभीर घटना आहे. भाजपची राज्यात सत्ता असताना हे अधिकच गंभीर आहे. सरकारचे लक्ष कमी पडले, अशा घोषणा देताना त्यांना भीती वाटली नाही.

हेही वाचा- पुणे : संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डाॅ. रामचंद्र देखणे यांचे निधन

मध्यवर्ती निवडणुका लागण्याची शक्यता

पाटील म्हणाले, देशात न्याय असेल तर सर्वोच्च न्यायालयात आम्हाला यश मिळेल. न्यायव्यवस्था राहिली नसल्यास आम्हाला यश मिळणार नाही. दहाव्या सूचीनुसार त्या आमदारांचं निलंबन व्हायला हवं. तसे झाल्यास मध्यवर्ती निवडणुका लागण्याची शक्यता आहे. कारण त्या १६ आमदारांमध्ये थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही नाव आहे. त्यामुळे सरकार कोसळू शकते. त्यानंतर एकतर निवडणुका घ्याव्या लागतील तथा राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकेल. राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपाने टार्गेट केले आहे. कारण त्यांना राज्यात राष्ट्रवादीची अधिक भीती वाटते. राष्ट्रवादीचे नेते एकसंघपणे काम करत आहेत. त्यामुळे आपले संख्याबळ विधीमंडळात कमी होईल, असेही भाजपला वाटते. १२३ संख्याबळ असणारा पक्ष १०५ वर आला. आगामी काळात ते ८० च्या खाली येऊ शकतात. त्यामुळे राष्ट्रवादीला लक्ष्य करण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे, असे पाटील म्हणाले.

हेही वाचा- पिंपरीः जनमत विरोधात गेल्याने सरकारला निवडणुकांची धास्ती – जयंत पाटील

मंत्र्यांची मस्ती वाढली

तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सावंत यांच्या तोंडातून बोलतात. सावंतांचा आत्मविश्वास पाहता शिंदे-फडणवीस यांनी सावंतांना असे बोलण्याची पूर्ण मुभा दिलेली आहे. थोडक्यात काय तर सरकारमधील मंत्र्यांची मस्ती वाढलेली आहे, असे जयंत पाटील म्हणाले.