पुण्यात शिवसैनिकांनी धक्काबुक्की केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. धक्काबुक्की नंतर सोमय्यांना संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते  त्यानंतर माध्यमांसोबत बोलताना किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच महापालिकेमध्ये गुंड पाठवले होते असा आरोप केला होता. त्यावर आता राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात माध्यमांसोबत बोलताना जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यासाठी पुणे महापालिकेत शनिवारी भाजपा नेते किरीट सोमय्या आले, मात्र पालिकेच्या पायऱ्यांवरच शिवसैनिकांनी निदर्शने करत त्यांचा रस्ता अडवला. त्यामुळे झालेल्या गोंधळात त्यांना धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे ते खाली पडले. सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून तातडीने सोमय्या यांना गाडीत बसविले आणि सोमय्या यांना परतावे लागले. गोंधळात खाली पडल्यामुळे सोमय्या यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावर आता जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे.

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
CJI DY Chandrachud
केंद्रीय तपास यंत्रणांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोलाचा सल्ला; म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित…”
maval lok sabha marathi news, shrirang barne marathi news
मित्र पक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्यावर श्रीरंग बारणे यांचा भर, गाठीभेटी सुरू

“जी परिस्थिती असेल त्यानुसार पोलीस गुन्ह्याचे कलम लावतात. धक्काबुक्की, शिवीगाळ यासाठी कलम वेगवेगळे आहेत. जी घटना तिथे घडली त्यानुसार पोलीसांनी कलम लावले आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने त्यांना सुरक्षा पुरवायला हवी होती. ते कमी पडल्याने किरीट सोमय्यांचे प्रकरण धक्काबुक्की पर्यंत गेले, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

किरीट सोमय्यांनी हल्ला करण्यासाठी मुख्यमंत्र्याचा आदेश होता असा आरोप केल्याचे पत्रकरांनी म्हटले. त्यावरही जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. “मुख्यमंत्री त्या प्रवृत्तीचे असे आम्हाला आढळून आलेले नाही. तिथे स्थानिक नगरपालिकेत बाचाबाची झाली होती. त्याला जास्त महत्त्व देण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही,” असे जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, सोमय्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे त्यांनी जम्बो करोना रुग्णालयात घोटाळा झाल्याची तक्रार दिली. तिथून ते  महापालिकेत आयुक्त विक्रमकुमार यांना निवेदन देण्यासाठी येणार होते, याची कुणकुण शिवसैनिकांना लागताच सुमारे १०० शिवसैनिक महापालिका आवारात दाखल झाले. सोमय्या गाडीतून उतरून आयुक्तांना भेटण्यासाठी जात असताना शिवसैनिकांनी त्यांना अडवले, ‘तुम्ही पुणे महापालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल का बोलत नाही, निवडक प्रकरणावर का चर्चा करता,’ असा जाब त्यांनी विचारला. त्यावर सोमय्या यांनी ‘मला माहिती द्या, मी त्याबद्दलही प्रशासनाशी बोलतो’, असे सांगितले.

जमलेले शिवसैनिक घोषणाबाजी करत सोमय्यांच्या दिशेने आले. सुरक्षारक्षकांनी घेराव घालून सोमय्या यांना महापालिकेच्या इमारतीमध्ये नेण्याचा प्रयत्न केला, पण आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी सोमय्या यांना अडवून धक्काबुक्कीला सुरुवात केली. त्यामुळे परतताना पायऱ्या उतरताना सोमय्या खाली पडले.