पुणे : सेवानिवृत्त सरकारी वकिलाच्या मोटारीतून चालकाने दोन लाख ६० हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका सेवानिवृत्त सरकारी वकिलांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मोटार चालक जमीर शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेवानिवृत्त सरकारी वकील कसबा पेठेत राहायला आहेत. सेवानिवृत्त सरकारी वकील आणि त्यांचे कुटुंबीय मूळ गावी गेले होते. गावावरुन परतत असताना ते हडपसर भागातील एका पेट्रोल पंपावर थांबले होते. शेखने त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधली. मोटारीत ठेवलेल्या पिशवीतून दागिने शेखने लांबविले. त्यानंतर कुटुंबीय घरी परतले. तेव्हा पिशवीतून दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आले. मोटार चालक शेखने दागिने चोरल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे.  पोलीस कर्मचारी लोणकर तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jewelery stolen retired public prosecutor car crime against motorist pune print news ysh
First published on: 05-07-2022 at 12:50 IST