scorecardresearch

पुणे : पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या महिलेचे दागिने लांबविले

गेल्या काही महिन्यांपासून पीएमपी बसच्या प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

पुणे : पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या महिलेचे दागिने लांबविले
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना स्वारगेट परिसरात घडली. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला स्वारगेट पीएमपी स्थानकातून बिबवेवाडीकडे जाणाऱ्या बसमधून प्रवेश करत हाेत्या. त्या वेळी बसमध्ये गर्दी होती.

चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ३५ हजारांचे मंगळसूत्र लांबविले. पोलीस कर्मचारी तारू तपास करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पीएमपी बसच्या प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून शहरातील प्रमुख पीएमपी स्थानकांच्या परिसरात चोरट्यांच्या सुळसुळाट झाला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.