scorecardresearch

पुणे : ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेतून नऊ लाखांचे दागिने लांबविले ; मीरा सोसायटीतील घटना

सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी ऐवज लांबविला

पुणे : ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेतून नऊ लाखांचे दागिने लांबविले ; मीरा सोसायटीतील घटना
( संग्रहित छायचित्र )

ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेतून चोरट्यांनी नऊ लाख आठ हजारांचे दागिने लांबविल्याची घटना शंकरशेठ रस्त्यावरील मीरा सोसायटीत घडली.

याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाची सदनिका मीरा सोसायटीत आहे. चोरट्यांनी सदनिकेतून नऊ लाख आठ हजारांचे २९ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लांबविल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी ऐवज लांबविल्याचे ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून पोलीस उपनिरीक्षक येवले तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या