Jewellery worth rs 1 lakh 35 thousand stolen from woman passenger in st bus pune print news zws 70 | Loksatta

पुणे: एसटी प्रवासी महिलेचे एक लाख ३५ हजारांचे दागिने चोरले

तक्रारदार महिला हडपसर भागात राहायला आहेत. त्या एसटी बसने कराडला निघाल्या होत्या.

पुणे: एसटी प्रवासी महिलेचे एक लाख ३५ हजारांचे दागिने चोरले
photo source : लोकसत्ता डेस्क टीम

एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी एक लाख ३५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला हडपसर भागात राहायला आहेत. त्या एसटी बसने कराडला निघाल्या होत्या. हडपसरमधून त्या रिक्षाने स्वारगेट एसटी स्थानकात आल्या. स्वारगेट एसटी स्थानकात बसमध्ये प्रवेश करत असताना चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतून एक लाख ३५ हजार रुपयांचे मंगळसूत्र लांबविले. पोलीस कर्मचारी अभय झेडे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 17:08 IST
Next Story
पुणे : डांबरीकरणाच्या कामामुळे कात्रज घाटात एकेरी वाहतूक