दिल्लीतील ‘मोहल्ला क्लिनिक’च्या धर्तीवर पिंपरी पालिकेने शहरभरात दाट लोकवस्ती असणाऱ्या २५ ठिकाणी ‘जिजाऊ क्लिनिक’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्राथमिक स्तरावर १ कोटी ६५ लाख रूपये खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रशासकीय बैठकीत याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात २५ पैकी १० ठिकाणी अशाप्रकारचे क्लिनिक उभारण्यात येणार आहेत. यामुळे शहरवासीयांना घराजवळच लहान मोठ्या आजारांवर उपचार करणे शक्य होणार आहे.

हेही वाचा >>>पुणे: नदीपात्रातील मेट्रो मार्गिकेबाबतची याचिका ‘एनजीटी’कडून रद्द

झोपडपट्टी, चाळी, दाट लोकवस्तीची ठिकाणे अशाप्रकारे ८ ते १० हजार लोकवस्ती असलेल्या भागात ही वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. दोन ठिकाणांमध्ये एक किलोमीटरपर्यंत पालिकेचे दवाखाने असणार नाहीत. यासाठी प्रामुख्याने पालिकेच्या मिळकतींचा वापर केला जाणार असून आवश्यकतेप्रमाणे खासगी मिळकती उपलब्ध केल्या जाणार आहेत. काही ठिकाणी कंटेनर उभे करून जिजाऊ क्लिनिकचे काम केले जाणार आहे.

‘जिजाऊ क्लिनिक’साठी आवश्यक मनुष्यबळ वैद्यकीय विभागाकडून देण्यात येणार आहे. जिजाऊ क्लिनिकचा आराखडा तयार करणे, निधीचा वापर करणे, संख्या व जागा ठरवणे याबाबतचे सर्वाधिकार वैद्यकीय विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jijau clinic at 25 places in pimpri chinchwad amy
First published on: 30-11-2022 at 20:17 IST