पुण्यातील पोर्श कारच्या अपघातावरून राजकीय वातावरण तापलं आहे. अपघात प्रकरणील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याचे गंभीर आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटातील आमदार सुनील टिंगरे यांचं या प्रकरणात नाव समोर आलं आहे. तसेच अल्पवयीन आरोपी मद्यधुंद अवस्थेत कार चालवत नव्हता हे सिद्ध करण्यासाठी ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिंग विभागातील दोन डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप होत असून या दोन्ही डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच न्यायालयाने त्यांना आता पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या दोन्ही डॉक्टरांचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील नेते हसन मुश्रीफांशी संबंध असून मुश्रीफांनीच त्यांना पाठिशी घातल्याचा, त्या पदांवर नियुक्त केल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

दरम्यान, आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट अजित पवारांवर टीका केली आहे. “अजित पवार हे पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणावर काहीही बोलताना दिसत नाहीत” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. “त्या बांधकाम कंपनीचे (आरोपीच्या वडिलांची कंपनी) कोणाकोणाबरोबर संबंध आहेत हे सर्वांना माहिती आहे. तसेच पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कार्यालय खरेदी करण्यासाठी कोणाचा दबाव होता हे देखील राष्ट्रवादीच्या लोकांना माहिती आहे”, असं म्हणत आव्हाडांनी नाव न घेता अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
What Kiran Mane Said About Manusmruti?
“सुंदर स्त्री हीन जातीतली असली तरी तिला भोगण्यात…”, ‘मनुस्मृती’तलं वाक्य सांगत किरण मानेंची खरमरीत पोस्ट
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
ajit pawar anjali damania
“अजित पवारांचं आव्हान स्वीकारते, पण एक अट…”, अंजली दमानियांचं प्रत्युत्तर ; म्हणाल्या, “तुमचे विशाल अग्रवालशी…”
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत

हे ही वाचा >> “…म्हणून २००४ मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला नाही”, सुधाकरराव नाईकांचा उल्लेख करत अजितदादांनी सांगितली पवारांची भीती

जितेंद्र आव्हाड म्हणाले, पुण्यातील अपघात प्रकरण खूप गंभीर आहे. मात्र पुण्याचे पालकमंत्री अजित पवार त्यावर काहीही बोलताना दिसत नाहीत. आरोपीच्या वडिलांच्या बांधकाम कंपनीचे कोणाशी संबंध आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यातील कार्यालय विकत घेण्यासाठी कोणाचा दबाव टाकून प्रयत्न केले गेले? कोणाच्या दबावात ते कार्यालय काढून घेण्याचा प्रयत्न केला गेला? तो प्रयत्न कसा झाला? हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना चांगलंच माहिती आहे. ती कंपनी कोणकोणत्या गोष्टीत सहभागी आहे हे देखील आम्हाला माहिती आहे. त्या कंपनीचा मालक कोणकोणत्या राजकीय प्रकरणांमध्ये कसा सहभागी होता? हे सर्वांना माहिती आहे. कुठल्या साथीदाराने आपल्याला काय सांगितलेलं? किती रक्कम आणून देतो असं सांगितलेलं? हे सगळं सर्वांना माहिती आहे. मी यावर एवढंच बोलेन की ‘बंद मुट्ठी लाख की और खुल गई तो ख़ाक की’. उगाच नको तिथे जाऊन कोणीही चिमटे काढण्याचा प्रयत्न करू नये.