जुन्नर : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील जुन्नर येथील पिंपरी पेंढारजवळ खासगी प्रवासी वाहतूक करणारे वाहन आणि मोटार यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या दुर्घटनेत मोटारचालक जागीच ठार झाला. बुधवारी पहाटे पाच वाजता हा अपघात झाला.
मोचारचालक अनिकेत पानसरे (वय ३२, रा. ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे) जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर खासगी प्रवासी वाहनचालक पसार झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओतूरकडून आळेफाट्याकडे खासगी प्रवासी वाहन चालले असताना विरूद्ध दिशेने मोटार येत होती. दोन्ही वाहने समोरासमोर धडकली. त्यामध्ये पानसरे यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शामसुंदर जायभाये, राजेंद्र आमले, सुभाष केदारी, होमगार्ड संदीप शिंदे, चैतन्य जाधव आणि प्रवीण भोर घटनास्थळी दाखल झाले.
या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून दूर केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
