नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला जिल्हा शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शालेय परिसरातील स्वच्छता , शाळा राबवित असलेले विविध उपक्रम पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले .
ग्रामीण भागातील शाळा असताना देखील जिल्हा शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांजरवाडी शाळेतील परिसर स्वच्छता , शालेय बाग परसबाग, सुसज्ज वर्ग खोल्या, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, वाचनालय, शालेय मैदान, सांस्कृतिक भवन, विद्यार्थी बैठक व्यवस्था, विद्यार्थी वैयक्तिक स्वच्छता, शालेय पोषण आहार कक्ष, मुख्याध्यापक कक्ष तसेच शाळा राबवित असलेले विविध उपक्रम या सर्व बाबींची माहिती घेऊन, विद्यार्थी गुणवत्तेसाठी विविध उपक्रमांची माहिती घेतली. तसेच प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्याशी संवाद साधून त्यांची गुणवत्ता पाहून समाधान व्यक्त केले.
इयत्ता सहावी आणि इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांची इस्रो आणि नासा भेटीसाठी घेण्यात आलेल्या चाचणी परीक्षेतील कामगिरी , विद्यार्थ्यांची दिल्लीत राष्ट्रपतींची भेट, २०२५-२६ चा अध्यक्ष चषक पुरस्कार प्राप्त शाळा, शिष्यवृत्ती परीक्षेतील यश; तसेच शाळेने विविध स्पर्धामध्ये मिळविलेले बक्षिसे पाहून समाधान व्यक्त केले.
ग्रामस्थांचे शाळेसाठी मोठ्या प्रमाणात योगदान आहे. ही शाळा आदर्श शाळा म्हणून नावारूपाला आली आहे , असे गौरोवोदगार नाईकडे यांनी काढले
शाळेला मार्गदर्शन करणारे माऊली खंडागळे, गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे , विस्तार अधिकारी अशोक गोडसे , विष्णू धोडगे , केंद्रप्रमुख अशोक पारधी, सरपंच सारिका गायकवाड, उपसरपंच संतोष मोरे. यावेळी किरण थोरात, मनीषा मुळे, उदय खंडागळे सचिन टाव्हरे , मुख्याध्यापक संगीता बेल्हेकर, सयाजीराव चिखले, बबनराव सानप, कमल वायाळ, साधना घाडगे, अश्विनी काकडे, सीमा लांडे उपस्थित होते.
