पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोटारचालक अल्पवयीनाच्या मित्राचे रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावला. अरुणकुमार देवनाथ सिंग असे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने सिंग याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने याबाबतचे आदेश दिले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या सिंग याला आता पुणे पोलिसांसमोर शरण यावे लागणार आहे.

येरवड्यातील कल्याणीनगर भागात १९ मे राेजी भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मोटारचालक अल्पवयीनाबरोबर मोटारीत त्याचे दोन मित्र होते. अगरवालचा मुलगा, त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांनी मद्यप्राशन केले होते. वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. रुग्णालायत तिघांच्या रक्ताच्या नमुन्यात बदल करण्यात आले होते. बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, त्याची पत्नी, शिवानी, अरुणकुमार सिंग यांनी ससूनमधील डाॅ. अजय तावरे, डाॅ. श्रीहरी हाळानोर यांच्याशी संगनमत करुन रक्ताचे नमुने बदलल्याचे तपासात उघड झाले होते. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
cases filed by excise department, assembly elections,
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाकडून ९२३ गुन्हे दाखल
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?

हेही वाचा – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाकडून ९२३ गुन्हे दाखल

हेही वाचा – हर्षवर्धन यांच्या चुलत बंधूंचा प्रवीण माने यांना पाठिंबा

गुन्हा दाखल केल्यानंतर सिंग पसार झाला होता. त्याने याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी शिवाजीनगर, तसेच मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केले होते. त्याचे अर्ज फेटाळण्यात आले होते. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवून सिंग याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. मुंबई उच्च न्यायालयात विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी सिंग याला अटकपूर्व जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद केला होता.

Story img Loader