करीना कपूरने शेअर केला पुणे पोलिसांचा ‘तो’ व्हिडीओ, राज कपूर यांच्या चित्रपटातील गाणे ऐकताच म्हणाली…

करोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे.

राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रात सोमवारी नव्याने ३१ हजार १११ करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ही ७२ लाख ४२ हजार ९२१ इतकी झाली आहे. राज्यात वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांसह जिल्हा प्रशासनाकडून नियम पाळण्याबाबत जनजागृती केली जात आहे. नुकतंच पुणे पोलिसांनी अभिनेते राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातील एका गाण्याद्वारे कोरोना नियम पाळण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा व्हिडीओ स्वत: अभिनेत्री करीना कपूर हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत कौतुक केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर पुणे पोलिसांच्या करोना जनजागृती मोहिमेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. करीनाने शेअर केलेला हा व्हिडीओ एका न्यूज चॅनलचा आहे. करोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. यात त्यांनी राज कपूर यांचा ‘मेरा नाम जोकर’ या अतिशय लोकप्रिय झालेल्या चित्रपटातील ‘ए भाई जरा देख के चलो’ या गाण्याचा वापर करत जनजागृती केली आहे.

या गाण्याला पोलिसांनी थोडे रिक्रिएट केले आहे. ‘ए भाई मास्क पेहन के चलो, आते ही नही जाते ही,’ असे त्या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याद्वारे पुणे पोलिसांनी लोकांना मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटायझरचा वापर करा, असा सल्ला दिला आहे.

करीना कपूरने तिच्या आजोबांच्या चित्रपटातील हे गाणे ऐकल्यानंतर तिला ते प्रचंड आवडले. त्यानंतर तिने या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओला कॅप्शन देताना तिने पुणे पोलिसांचे कौतुक केले आहे. उत्तम व्हिडीओ असे तिने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे. त्यासोबत तिने टाळ्या वाजणारे दोन हात असलेला इमोजीही शेअर केला आहे. तसेच तिने हा व्हिडीओ शेअर करतेवेळी पुणे पोलिसांनाही टॅग केले आहे.

Wikipedia वरील स्वत:चा ‘तो’ उल्लेख पाहून संतापली तनुश्री दत्ता; म्हणाली “माझं…”

पुणे पोलिसांनीही तिच्या या व्हिडीओवर कमेंट केली आहे. “आमच्या प्रयत्नांचे कौतुक केल्याबद्दल धन्यवाद. नेहमी मास्क परिधान करा. #राजकपूर. असे त्यांनी यात म्हटले आहे. दरम्यान ख्वाजा अहमद अब्बास यांनी लिहिलेला राज कपूर यांचा ‘मेरा नाम जोकर’ १९७० साली प्रदर्शित झाला होता. राज कपूर यांच्यासोबत या चित्रपटात सिमी गरेवाल, ऋषी कपूर, मनोज कुमार, धर्मेंद्र, दारा सिंग आणि राजेंद्र हे कलाकार झळकले होते.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kareena kapoor khan shares pune police covid 19 awareness video featuring raj kapoor nrp

Next Story
“पुणे मेट्रोत कोणतंही योगदान नाही म्हणून सीटवर का बसू असा प्रश्न शरद पवारांना पडला का?”
फोटो गॅलरी