Kasba Chinchwad Vote Counting Updates, 02 March 2023: गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेल्या कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा आज मतमोजणीचा दिवस आहे. कसब्यातली सर्व २० फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून त्यामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. भाजपाच्या हेमंत रासनेंनी आपला पराभव मान्य केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा मोठा विजय झाला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कसबा पोटनिवडणुकीत आमचा विजय होईल याची आम्हाला खात्री वाटत होती. मात्र तिकडे पराभव झाला आहे. त्याचं आम्ही आत्मचिंतन नक्की करू. २०२४ ला कसबा पुन्हा जिंकू असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Live Updates

Kasba Peth Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Updates in Marathi: पुण्यात आज मतमोजणीचा दिवस, मतदारांचा कौल कुणाला?

11:21 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: १५व्या फेरीअखेर धंगेकरांना ६००७ मतांची आघाडी

कसब्यामध्ये १५व्या फेरीअखेर रवींद्र धंगेकरांना ६००७ मतांची आघाडी मिळाली आहे.

11:13 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: १४व्या फेरीअखेर धंगेकरांना ४८५० मतांची आघाडी

कसब्यामध्ये रवींद्र धंगेकरांच्या कार्यकर्त्यांकडून विजयी जल्लोषाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आता ४८५० मतांची आघाडी आली आहे.

11:11 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना ८५६४ मतांची आघाडी

पिंपरी चिंचवड – अकरावी फेरी –

– अश्विनी जगताप – ३८२० भाजप – ११३३ ची आघाडी

एकूण आघाडी – ८५६४

– नाना काटे – २६८२ एनसीपी

– राहूल कलाटे – ७८९ अपक्ष

11:02 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना मोठी आघाडी

पिंपरी चिंचवड – दहावी फेरी –

– अश्विनी जगताप – ६६४९ भाजप – १०७० ची आघाडी

एकूण आघाडी – ७४१६

– नाना काटे – २५८९ एनसीपी

– राहूल कलाटे – ७२४ अपक्ष

10:51 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: “मला मनसेच्या नेत्याचा फोन आला की…”, रवींद्र धंगेकरांचं विधान चर्चेत!

मी बरोबरीत राहायला बघत होतो, मला आघाडी मिळतेय. मनसेच्या एका नेत्याचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की तुम्ही विजयी झाले आहात. कारण त्यांनीच काम केलंय – रवींद्र धंगेकर

10:47 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: दहाव्.या फेरीत धंगेकरांना ४२७७ मतांची आघाडी

२८ वर्षं भाजपाच्या हाती असलेल्या कसबा मतदारसंघात मविआकडून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी मुसंडी मारत दहाव्या फेरीअखेरपर्यंत ४२७७ मतांची आघाडी घेतली आहे. त्यांना आत्तापर्यंत ४११८८ मतं मिळाली आहेत.

10:44 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: कसब्यात नवव्या फेरीनंतर अश्विनी जगतापांकडे ६३५६ ची आघाडी!

अश्विनी जगताप – ३५५९ भाजप – १४३७ ची लीड

एकूण लीड – ६३५६

– नाना काटे – २१२२ एनसीपी

– राहूल कलाटे – ६५४ अपक्ष

10:41 (IST) 2 Mar 2023
Kasba Chinchwad Bypoll Election: कसब्यात भाजपाचा विजय शिवसेनेमुळेच होत होता – संजय राऊत

कसब्यात भाजपाचा विजय हा नेहमी शिवसेनेच्या पाठिंब्यानंच होत आला. आज शिवसेना मविआची घटक आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत. त्याचा परिणाम तिथे दिसतोय. चिंचवडमध्ये तर भाजपाला शेवटपर्यंत घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. तिथे तिरंगी लढत आहे. आम्ही अपेक्षा ठेवून आहोत – संजय राऊत

10:34 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: आनंद दवेंची मतांची शंभरी

हिंदू महासंघाचे अपक्ष उमेदवार आनंद दवे यांनी शंभरी गाठली आहे. तिस-या फेरी अखेर आनंद दवे यांना शंभर मते प्राप्त झाली आहेत.

10:32 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: चिंचवडमध्ये आठव्या फेरीअखेर…

– अश्विनी जगताप – ३६०२ भाजप – ८३७ ची आघाडी

एकूण आघाडी – ४९२९

– नाना काटे – २७६५ एनसीपी

– राहूल कलाटे – १०५२ अपक्ष

10:26 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: धंगेकरांना नवव्या फेरीत ४७०० ची आघाडी

कसब्यात मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना नवव्या फेरीअखेरीस ४७०० मतांची आघाडी

10:16 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: सातव्या फेरीत अश्विनी जगताप यांची आघाडी कायम..

पिंपरी चिंचवड – सातवी फेरी –

– अश्विनी जगताप – ३८८८ भाजप – ७८० ची लीड – एकूण लीड – ४०९१

– नाना काटे -३१०८ एनसीपी

– राहूल कलाटे – १०९८ अपक्ष

10:03 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: चिंचवडमध्ये सहाव्या फेरीनंतर…

पिंपरी चिंचवड – सहावी फेरी –

अश्विनी जगताप – ४००७ भाजप – ३७२ ची लीड – एकूण लीड – ३३४१

नाना काटे -३६३५ एनसीपी

राहुल कलाटे – २१४१ अपक्ष

10:02 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: राहुल कलाटेंचं सूचक विधान; म्हणाले, “राज की बात आता…”

राज की बात आता समोर येईलच. राजकारणात आजची गोष्ट उद्या उघड होतेच. दोन्ही पक्षांचे प्रतिनिधी आणि आपापसातील वाद हे प्रकार होत होते. जनता त्यांच्या पैशाला भीक न घालता माझ्याकडे चांगला पर्याय म्हणून पाहतील असं वाटत होतं. निम्म्या फेऱ्या झाल्यानंतर चित्र लक्षात येईल – राहुल कलाटेंचं सूचक विधान

10:00 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: कालच माझी पत्नी म्हणाली की… – रवींद्र धंगेकर

कालच माझी पत्नी म्हणाली की तुम्हाला आता सगळं अवघड आहे. तुमच्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. तुम्हाला खूप काम करायचं आहे – रवींद्र धंगेकर

09:59 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: “लोकांनी पैसे घरात ठेवले आणि..”, धंगेकरांच्या विधानाची चर्चा!

विरोधकांनी वाटलेले पैसे लोकांनी घरात ठेवले आणि ह्रदयातला धंगेकर काढून मतदानाला आले – रवींद्र धंगेकर

09:50 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: अश्विनी जगताप यांची भावनिक प्रतिक्रिया!

अश्विनी जगताप यांची भावनिक प्रतिक्रिया…

09:43 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: नोटाला ८६ मतं…

कसबा विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणीच्या पहिल्या फेरीत ८६ मतदारांनी कोणत्याही उमेवाराला पसंती दर्शविली नाही. या मतदारांनी नोटा या पर्यायाला पसंती दिली आहे.

दुस-या फेरीतहही किती मतदार नोटाला पसंती देतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरले आहे.

09:41 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: अश्विनी जगतापांची आघाडी जैसे थे

चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांची आघाडी चौख्या फेरीअखेरही कायम आहे.

अश्विनी जगताप २७७५

नाना काटे २१५९

राहुल कलाटे १०५८

चौथ्या फेरीत जगताप यांच्याकडे ६१६ मतांची आघाडी

09:40 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: पाचव्या फेरीत रवींद्र धंगेकरांना…

कसब्यामध्ये पाचव्या फेरीत रवींद्र धंगेकरांकडे ५ हजार मतांची आघाडी आली आहे. रवींद्र धंगेकरांना मिळालेल्या मतांचा आकडा १४ हजाराच्या वर गेला आहे.

09:24 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: बिनविरोध निवडणुकीबाबत अश्विनी जगताप यांची भावनिक प्रतिक्रिया; म्हणाल्या, “विरोधकांनी फॉर्म…”!

अश्विनी जगताप म्हणतात, “ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. लक्ष्मण जगताप यांनी तेवढा विकास केला आहे. त्यांच्या अकस्मिक जाण्यामुळे ही निवडणूक लागली. इतक्या लवकर निवडणूक लागेल असं वाटलं नव्हतं. विरोधकांनी..!”

वाचा सविस्तर

09:23 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: अभिजित बिचुकलेंना दुसऱ्या फेरीत ४ मतं…

कसब्यात अभिजित बिचुकलेंनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना ४ मतं मिळाली असून हिंदू महासभेचे आनंद दवे यांना १२ मतं मिळाली आहेत.

09:12 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: कसब्यात रवींद्र धंगेकर आघाडीवर

दुसऱ्या फेरीमध्ये मविआचे रवींद्र धंगेकर कसब्यातून आघाडीवर आहेत. धंगेकरांना ५ हजार तर भाजपाच्या हेमंत रासनेंना २८०० मतं मिळाली आहेत.

09:05 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: दुसऱ्या फेरीतही अश्विनी जगताप आघाडीवर

चिंचवडमध्ये दुसऱ्या फेरीमध्येही अश्विनी जगताप आघाडीवर आहेत. अश्विनी जगताप यांना ३८२९, नाना काटेंना ३६०२ तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना १३७२ मतं मिळाली आहेत. आता अश्विनी जगताप यांची आघाडी ६७६ मतांची झाली आहे.

08:51 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: “मी पोस्टलमध्ये आघाडीवर म्हणजे विषयच संपला”

या निवडणुकीत आश्चर्यकारक निकाल लागणार आहे. मी पोस्टल मतांमध्ये कायम आघाडीवर राहतो. आता शेवटच्या फेरीपर्यंत माझी अशीच आघाडी राहणार. माझं लीड २ हजार मतांच्या पुढे जाईल. मतांची कोणतीही विभागणी होणार नाही. मी पोस्टलमध्ये आघाडीवर आलो म्हणचे विषयच संपला – रवींद्र धंगेकर

08:49 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: कसब्यात काँग्रेसची आघाडी

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रविंद्र धंगेकर २२०० मतांनी पुढे…

08:41 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: अश्विनी जगताप यांना पहिल्या फेरीत…

चिंचवडमध्ये भाजपा उमेदवार अश्विनी जगताप यांना ४१६७ मतं, मविआच्या नाना काटेंना ३६४८ मतं तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंना १६७४ मतं… अश्विनी जगताप यांच्याकडे ५१९ मतांची आघाडी…

08:32 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: कसब्यात मविआची आगेकूच…

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर पोस्टल मतदानात पुढे…

08:32 (IST) 2 Mar 2023
Kasba Chinchwad Bypoll Election: आजच्या मतमोजणीची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर!

कसबा आणि पिंपरी चिंचवड मतमोजणीची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…

08:30 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: पोस्टल मतदानात अश्विनी जगताप आघाडीवर

चिंचवडमध्ये पोस्टल मतमोजणीत भाजपा उमेदवार आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत.

08:26 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: बिनविरोध झाली असती, तर चांगलं झालं असतं – अश्विनी जगताप

ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. लक्ष्मण जगताप यांनी तेवढा विकास केला आहे. त्यांच्या अकस्मिक जाण्यामुळे ही निवडणूक लागली. इतक्या लवकर निवडणूक लागेल असं वाटलं नव्हतं. विरोधकांनी फॉर्म भरल्यामुळे आमच्या सगळ्यांवर भार पडायला लागला. बिनविरोध झाली असती निवडणूक तर चांगलं झालं असतं.

08:11 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: भाजपानं निवडणूक प्रतिष्ठेची केली – रुपाली ठोंबरे पाटील

भाजपानं यावेळी जाती-धर्मावर केली. पैसे वाटले. काही लोकांना पैसे वाटून बाहेर जायलाही सांगितलं. पण कसब्यातले मतदार ठाम होते. त्यांनी रवींद्र धंगेकरांना भरभरून मतदान केलं आहे. त्यांचा १० हजार मतांनी विजय होईल – रुपाली ठोंबरे पाटील

08:08 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: रुपाली ठोंबरे पाटील म्हणतात…

रवींद्र धंगेकरांचा विजय निश्चित आहे. कसब्यासह संपूर्ण महाराष्ट्राला आता कडक इस्त्रीचे कपडे घालणारा आमदार नको. काम करणारा आमदार हवाय. विधानसभेत प्रश्न मांडणारा आमदार हवाय. त्यामुळे धंगेकरांचा विजय निश्चित आहे. माणसं तोडायची, कुटुंबं तोडायची यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आत्तापर्यंत एकत्र लढत नव्हते. पण यावेळी ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी एकजुटीनं काम केलंय. त्यामुळे धंगेकरांचा विजय निश्चित आहे – रुपाली ठोंबरे पाटील

08:06 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: कसब्यात मतमोजणीच्या २० फेऱ्या होणार…

कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम येथे 8 वाजता सुरू झाली आहे.त्यासाठी मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार असून ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल तर टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आले आहे. टपाली आणि ईटीपीबीएसची सुरुवातीला मोजणी होणार आहे.त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी पर्यवेक्षक, 1 मतमोजणी सहायक आणि 1 सूक्ष्म निरीक्षक असे एकूण सुमारे 50 अधिकारी- कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

08:05 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: आनंद दवेंनाही कसब्यात विजयाची अपेक्षा!

हिंदू महासंघाची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढली आहे. या निवडणुकीने आम्हाला आत्मविश्वास दिला आहे. आमचा राजकीय पक्ष आहे. आमची उमेदवारी उभी केल्यामुळे कुणाचं नुकसान किंवा फायदा होत असेल, तर त्याचा विचार आम्ही करण्याचं कारण नाही. आमचा विचार आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालो आहे हे नक्की – आनंद दवे, हिंदू महासभेचे उमेदवार

08:03 (IST) 2 Mar 2023
Kasba Chinchwad Bypoll Election: पोस्टल मतमोजणीला सुरुवात

पुण्यात मतमोजणीला सुरुवात झाली असून आधी पोस्टल मतांची मोजणी केली जाणार आहे.

07:49 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: कसब्यात देवेंद्र फडणवीसांविरोधा तक्रार

कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप करत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रचारात फडणवीसांनी हिंदुत्वासाठी मतदान करा असं आवाहन केल्याचा दावा करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर

07:48 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: पोलिसांचा चोख बंदोबस्त…

कसब्यात मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त…

07:14 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: .. त्याच दिवशी माझा विजय निश्चित झाला होता – धंगेकर

मला उमेदवारी मिळाली, त्याच दिवशी माझा विजय निश्चित झाला होता. प्रचार वगैरे औपचारिकता मला करावी लागली. मी सर्व जातीधर्माच्या भिंती तोडून काम केलं आहे. मी कधीच आलेल्या माणसाचं नाव, त्याचा पत्ता विचारलेला नाही. माझा १५ हजार मतांनी विजय होईल – रवींद्र धंगेकर

07:13 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: हेमंत रासनेंना मोठ्या मताधिक्याची अपेक्षा

आम्ही खूप चांगल्या मताधिक्याने निवडून येऊ. काँग्रेसकडे ग्राऊंड रिअॅलिटिची कोणतीही माहिती नव्हती – हेमंत रासने

07:10 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: भाजपाला रवींद्र धंगेकरांची एकहाती टक्कर!

भाजपाचे हेमंत रासने यांच्याविरोधात कसब्यातून काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून या दोघांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. मंगळवारी माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी कसबा भाजपाच्या हातून जातेय असं विधान केल्यामुळे या जागेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

07:09 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: कसब्यात उमेदवारीवरून राजकारण

कसबा पोटनिवडणुकीत भाजपाकडून दिल्या गेलेल्या उमेदवारीवरून मोठं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. कसब्यातील दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत असताना भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यावरून मोठी चर्चा झाली.

07:07 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: चिंचवडमध्ये ५०.४७ टक्के मतदान!

चिंचवडमध्ये ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार असून त्यापैकी २ लाख ८७ हजार १४५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ५०.४७ टक्के मतदान झालं आहे.

07:06 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: चिंचवडमध्ये तिरंगी लढत

भाजपा उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या भवितव्याचा फैसला आज होणार.

06:43 (IST) 2 Mar 2023
Kasba Chinchwad Bypoll Election: निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर निकाल!

भारतीय निवडणूक आयोगाच्या https://results.eci.gov.in या संकेतस्थळावर सगळ्यांना फेरीनिहाय मतांची आकडेवारी पाहाता येणार आहे.

06:42 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: चिंचवडमध्ये मतमोजणीच्या ३७ फेऱ्या

चिंचवडच्या मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ आणि टपाली मतपत्रिकांसाठी एक, असे एकूण १५ टेबल असणार आहेत. १८ पर्यवेक्षक, १८ सहायक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. चिंचवडमध्ये मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार आहेत.

वाचा सविस्तर

06:41 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: कसब्यात मतमोजणीच्या २० फेऱ्या

कसब्याच्या मतमोजणीकरिता १६ टेबल अशी व्यवस्था केली असून मतमोजणीच्या २० फेऱ्या होणार आहेत. एकूण १८० कर्मचारी नियुक्त केले असून २७० कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. क्षेत्रीय अधिकाऱ्यांची संख्या २५ आहे.

वाचा सविस्तर

06:41 (IST) 2 Mar 2023
Kasba Chinchwad Bypoll Election: कसब्याचा निकाल आधी लागणार?

कसबा मतदारसंघांची मतमोजणी भारतीय खाद्य गोदाम, तर चिंचवडची मतमोजणी थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होणार आहे. चिंचवडमध्ये मतमोजणीच्या ३७, तर कसब्यात २० फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे चिंचवडपेक्षा कसब्याचा निकाल आधी स्पष्ट होणार आहे.

वाचा सविस्तर

06:40 (IST) 2 Mar 2023
Kasba Chinchwad Bypoll Election: २६ फेब्रुवारीला झालं मतदान

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी रविवारी (२६ फेब्रुवारी) मतदान झाले. मतमोजणी गुरुवारी (२ मार्च) होत आहे.

वाचा सविस्तर

06:39 (IST) 2 Mar 2023
Kasba Chinchwad Bypoll Election: कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होणार

मतदान यंत्रांमधील मतमोजणी झाल्यानंतर व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची शहानिशा होणार असल्याने निकालाला काहीसा विलंब होणार आहे. तरीदेखील दुपारपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होणार आहे.

वाचा सविस्तर

(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

Kasba Peth Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Updates in Marathi: पुण्यात आज मतमोजणीचा दिवस, मतदारांचा कौल कुणाला?