Kasba Chinchwad Vote Counting Updates, 02 March 2023: गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेल्या कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा आज मतमोजणीचा दिवस आहे. कसब्यातली सर्व २० फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून त्यामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. भाजपाच्या हेमंत रासनेंनी आपला पराभव मान्य केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा मोठा विजय झाला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कसबा पोटनिवडणुकीत आमचा विजय होईल याची आम्हाला खात्री वाटत होती. मात्र तिकडे पराभव झाला आहे. त्याचं आम्ही आत्मचिंतन नक्की करू. २०२४ ला कसबा पुन्हा जिंकू असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Live Updates

Kasba Peth Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Updates in Marathi: पुण्यात आज मतमोजणीचा दिवस, मतदारांचा कौल कुणाला?

06:37 (IST) 2 Mar 2023
Kasba Chinchwad Bypoll Election: पुण्यात आज मतमोजणीचा दिवस!

पुण्यात कसबा आणि पिंपरी-चिंचवड या दोन मतदारसंघांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी होणार आहे. संध्याकाळपर्यंत अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

Kasba Peth Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Updates in Marathi: पुण्यात आज मतमोजणीचा दिवस, मतदारांचा कौल कुणाला?