पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२० चा अंतिम निकाल आणि शिफारस यादी जाहीर करण्यात आली. निकालात, रोहित कट्टे यांनी सर्वसाधारण प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक पटकावला. तर पवन नाईक यांनी मागासवर्ग प्रवर्गातून, कीर्ती कुंजीर यांनी महिला प्रवर्गातून पहिला क्रमांक मिळवला.

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे निकालाची माहिती दिली. ९ ते १३ मे आणि २३ ते २७ मे या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या होत्या. पाच संवर्गातील २१७ पदांपैकी २१५ उमेदवारांची शिफारस करण्यात आली.निकाल आणि प्रत्येक प्रवर्गासाठीचे पात्रता गुणही जाहीर करण्यात आले.  शिफारसपात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणांची पडताळणी करायची असल्यास उमेदवारांनी निकाल त्यांच्या ऑनलाइन खात्यात पाठवल्याच्या दहा दिवसांत आयोगाकडे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

Maharashtra, ST Staff Congress, Practice Camp, Employee Promotion Exam, msrtc, ST Corporation,
एसटी महामंडळात सर्वात मोठी कर्मचारी बढती परीक्षा….
Surrogate Mother Case, First in nagpur, Approved, Surrogacy Act 2021, District Medical Board,
नवीन कायद्यानुसार नागपुरात पहिल्या ‘सरोगेट मदर’ प्रकरणास मंजुरी
Use of eco-friendly briquette for crematories Navi Mumbai Municipal Corporation on pilot basis
स्मशानभूमीसाठी पर्यावरणपूरक ‘ब्रिकेट’, नवी मुंबई महापालिकेचा प्रायोगिक तत्वावर वापर
जलसंधारण अधिकारी परीक्षेचा पेपर फुटला, विभागाच्या अधिकाऱ्यानेच प्रश्नपत्रिका फोडली!

शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या अर्जातील विविध आरक्षणविषयक दाव्यांच्या अनुषंगाने त्यांनी मुलाखतीवेळी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची वैधता सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत तपासणी करून उमेदवारांना संबंधित पदावर नियुक्ती देण्यात येईल. उमेदवारांनी अर्जात दिलेली माहिती खोटी किंवा चुकीची आढळून आल्यास किंवा अर्जातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्या वेळी न केल्यास आणि अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. न्यायालयात किंवा न्यायाधीकरणात दाखल विविध न्यायिक प्रकरणांतील अंतिम न्यायनिर्णयाच्या, आरक्षणासंदर्भात प्रकरणपरत्वे शासनाकडून होणाऱ्या कार्यवाहीच्या अधीन राहून निकाल जाहीर करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.