चार खाटांच्या प्रसूती केंद्रापासून १९१२ मध्ये पुण्यात केईएम रुग्णालयाचा प्रवास सुरू झाला. १९६७ मध्ये जनरल हॉस्पिटलच्या स्वरूपात कामकाजाचा सुरुवात झाल्यावर आज रुग्णसेवेची ११० वर्षे पूर्ण करताना रुग्णालयाची व्याप्ती ६०० खाटा आणि ‘टर्शरी केअर’ सेवा देण्यापर्यंत वाढली आहे. दर्जेदार उपचार आणि रुग्णांचा विश्वास, हेच या यशामागील गमक आहे, अशी भावना ‘हॉस्पिटल विथ हार्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केईएम रुग्णालयाचे विश्वस्त डॉ. एफ. एफ. वाडिया यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे : पीकविमा, अतिवृष्टीची मदत मिळण्यास अडथळे?

केईएम रुग्णालयाने पुण्यात ११० वर्षे पूर्ण केल्याबद्दल एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहपोलीस आयुक्त सतीश गोवेकर, रुग्णालयाचे अध्यक्ष आणि वैद्यकीय संचालक डॉ. कुरूस कोयाजी, उपवैद्यकीय संचालक डॉ. झेर्झेस कोयाजी, संचालक मंडळाचे सदस्य श्रीराम यादव, अनिल लोखंडे, प्रशासक शिरीन वाडिया, वैद्यकीय प्रशासक डॉ. विश्वनाथ येमूल, वरिष्ठ उपवैद्यकीय प्रशासक डॉ. मधुर राव उपस्थित होते.रुग्णालयाचे वरिष्ठ उपवैद्यकीय प्रशासक डॉ. मधुर राव म्हणाले, सर्व स्तरातील रुग्णांना परवडणाऱ्या दरात अद्ययावत वैद्यकीय उपचार देण्याबाबत आम्ही आग्रही आहोत. ‘हॉस्पिटल विथ हार्ट’ ही आमच्या रुग्णालयाची ओळख असून आमच्यासाठी ती महत्त्वाची आहे.
रुग्णसेवेत वाहून घेणारे आमचे डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांच्या अथक परिश्रमांमुळेच ही वाटचाल शक्य झाल्याची भावनाही डॉ. राव यांनी या वेळी व्यक्त केली.

हेही वाचा >>> पुणे : पीकविमा, अतिवृष्टीची मदत मिळण्यास अडथळे?

डॉ. बानू कोयाजी यांच्या नेतृत्वाखाली या रुग्णालयाचे कामकाज सुरू झाले. नंतर १९९९ पासून डॉ. कुरूस कोयाजी यांनी रुग्णालयाची धुरा हाती घेतली. समर्पित तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी आणि रुग्णालयाला सढळ हस्ते मदत करणारे उदार दाते यांच्यामुळेच आजवरचा प्रवास शक्य झाल्याची भावना विश्वस्त मंडळाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kem has completed 110 years of patient care pune print news amy
First published on: 07-10-2022 at 14:46 IST