खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्याच्या जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे शंभर टक्के भरले आहे. खडकवासला धरण भरल्याने धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये रविवारी सायंकाळी सात वाजता ८५६ क्युसेक वेगाने मुठा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला.

हेही वाचा >>> पुणे : नागरिकांच्या कराचे दीड कोटी पाण्यात ; फिरत्या हौदांमध्ये १३ टक्के मूर्तींचे विसर्जन

cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’, पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

खडकवासला धरणाच्या क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने रविवारी रात्री विसर्गाचे प्रमाण वाढविण्यात आले. रात्री आठ वाजता सांडव्यावरून मुठा नदीमध्ये २ हजार ५६८ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. पावसाच्या प्रमाणावर विसर्गाचे प्रमाण कमी जास्त केले जाणार असून नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे आणि सतर्कता बाळगावी, असे आवाहन खडकवासला, पानशेत आणि वरसगाव प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता यो. स. भंडलकर यांनी केले आहे.