scorecardresearch

Premium

संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून सात वाजता मुठा नदीत पाणी सोडणार

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पांतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

khadakvasla dam

पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पांतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मंगळवारी सायंकाळी सात वाजल्यापासून खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात ४२८ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नदीपात्रालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.

पावसाच्या प्रमाणानुसार आणि धरणांच्या जलाशयात येणाऱ्या पाण्यानुसार पाण्याचा विसर्ग पुन्हा कमी / जास्त करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात वाहने, जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सखल भागातील संबंधित नागरीकांनी सतर्क राहावे, असेही जलसंपदा विभागाने कळविले आहे. दरम्यान, सायंकाळपर्यंत टेमघर धरणात ४५ टक्के, वरसगाव धरणात ६१ टक्के, पानशेत धरणात ६७ टक्के, तर खडकवासला धरणात ९१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

water discharge from Chandoli
सांगली : चांदोलीतून विसर्ग वाढवला, सतर्कतेचा इशारा
There is no yellow mosaic on soybeans
सोयाबीनवर तो ‘पिवळा मोझॅक’ नसून… शास्त्रज्ञांच्या पथकाचा शासनाला अहवाल
pune sewage water, sewage water discharged in khadakwasla dam, khadakwasla dam reservoir, sewage water discharged in pune dam
धक्कादायक : खडकवासला धरणाच्या जलाशयात सांडपाणी
dumping garbage forests Chirner area uran forests dumping grounds
उरणच्या रस्त्यांनंतर आता कचरा माफियांचे जंगल परिसरात अतिक्रमण; हिरवागार निसर्ग परिसर बनतोय डम्पिंग ग्राउंड

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Khadakwasla dam will release water mutha river at seven o clock pune print news psg 17 ysh

First published on: 25-07-2023 at 18:48 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×