पुणे : आर्थिक वादातून वकिलाने मित्राच्या वडिलांचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एका वकिलाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. नितीन म्हस्के (रा. छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याबरोबर असलेल्या चार ते पाच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात शरद पवार, सुप्रिया सुळेंचे मूक आंदोलन सुरू, महाविकास आघाडीतील नेतेमंडळी सहभागी

Gang rape of young woman in Bopdev ghat due to fear of coyote Pune print news
बोपदेव घाटात कोयत्याच्या धाकाने तरुणीवर सामुहिक बलात्कार; बलात्कारापूर्वी आरोपींकडून लूट
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Delhi Crime Doctor Shot dead in Hospital
Doctor Murder : “शेवटी २०२४ मध्ये हत्या केलीच”, डॉक्टरच्या हत्याप्रकरणी अल्पवयीन मुलगा गजाआड; सोशल मीडिया पोस्टही चर्चेत!
akshay shinde s father in high court
बदलापूर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण : पुरावे नष्ट करण्याची भीती व्यक्त करून अक्षय शिंदेच्या वडिलांची उच्च न्यायालयात धाव
karjat funeral marathi news
वडिलांच्या अंत्यविधीला बोलावले नाही म्हणून डोक्यात दगड घालून तरुणाने केला भावाचा खून
Thane, Husband wife suicide, Nadgaon area,
ठाणे : पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या
man kills sister s boyfriend over love affairs in dehu road
पिंपरी- चिंचवड: बहिणीच्या प्रियकराची भावाने केली हत्या; तीन जण ताब्यात, आज सकाळीच आढळला होता मृतदेह
Female police officer Angha Dhawale suspended for threatening friend wife Pune news
पुणे: मित्राच्या पत्नीला धमकी देणारी महिला पोलीस निलंबित

हेही वाचा – धक्कादायक ! दहावीतील विद्यार्थिनीचा शाळेच्या आवारात हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

हडपसर भागातील भाजी मंडई परिसरात नुकतीच ही घटना घडली. याबाबत एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार मूळचे छत्रपती संभाजीनगरचे आहेत. पाटबंधारे विभागातून ते निवृत्त झाले आहे. फिर्यादीचा मुलगा आणि म्हस्के मित्र आहेत. म्हस्के आणि तक्रारदाराच्या मुलात आर्थिक व्यवहार झाला होता. म्हस्के त्याला पैसे मागत होता. निवृत्त अधिकारी आणि त्यांचा मुलगा हडपसर भागात वास्तव्यास असल्याची माहिती म्हस्केला मिळाली. त्यानंतर तो साथीदारांसोबत हडपसर भागात आला. १९ ऑगस्ट रोजी फिर्यादीचे हडपसर भागातून अपहरण केले. त्यानंतर म्हस्केने त्यांच्या मुलाच्या मोबाइलवर संपर्क साधला. एक कोटी रुपये येणे आहे. ६० लाख रुपये दिले तर, वडिलांना सोडू, अशी धमकी म्हस्केने दिली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर परिसरातील वाळुंज पोलीस ठाण्यासमोर निवृत्त अधिकाऱ्याला सोडून म्हस्के आणि साथीदार पसार झाले. पुण्यात परतल्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.