scorecardresearch

कारागृहात पाळणाघर; ऑर्थर रोड कारागृह परिसरात महिला कैद्यांच्या मुलांसाठी बालवाडी

मुंबईतील भायखळा कारागृहाच्या (ऑर्थर रोड) परिसरात महिला कैद्यांच्या मुलांसाठी अंगणवाडी आणि हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे.

कारागृहात पाळणाघर; ऑर्थर रोड कारागृह परिसरात महिला कैद्यांच्या मुलांसाठी बालवाडी
ऑर्थर रोड कारागृह परिसरात महिला कैद्यांच्या मुलांसाठी बालवाडी (लोकसत्ता ग्राफिक्स)

पुणे : राज्यातील महिला कैद्यांच्या मुलांसाठी कारागृह प्रशासनाकडून ‘नन्हे कदम’ उपक्रम राबविण्यात आला आहे. मुंबईतील भायखळा कारागृहाच्या (ऑर्थर रोड) परिसरात महिला कैद्यांच्या मुलांसाठी अंगणवाडी आणि हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे.

मुंबईतील भायखळा कारागृहात ३५० महिला कैदी आहेत. एक वर्षाच्या बालकांपासून सहा वर्षांपर्यंतची १५ मुले त्यांच्या आईसोबत कारागृहात दाखल आहेत. या मुलांना कारागृहाबाहेरील वातावरणात शिक्षणाची संधी मिळावी, तसेच त्यांच्या भविष्यास उज्ज्वल दिशा मिळावी म्हणून शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या एकात्मिक बाल विकास कार्यक्रमाअंतर्गत महिला सेविका आणि मदतनिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंगणवाडीतील लहान मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यात येणार आहे.

हेही वाचा – स्वप्नांच्या अर्थाची भारतीयांना अधिक चिंता; ‘स्वप्नात दात का पडतात’ याबद्दल महाजालावर सर्वाधिक शोध

‘नन्हे कदम’ उपक्रमामुळे महिला कैद्यांच्या मुलांसह कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणाघराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य कारागृह विभागाकडून आंगन या सामाजिक संस्थेच्या सहकार्यातून ‘नन्हे कदम’ बालवाडी आणि हिरकणी कक्षाची स्थापना मुंबईतील भायखळा कारागृह परिसरात करण्यात आली आहे.

हेही वाचा – सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर पुणे महापालिकेची दंडात्मक कारवाई; १० दिवसांत वसूल केला तब्बल…

या उपक्रमाचे उद्घाटन राज्याच्या कारागृह विभागाचे प्रमुख अतिरिक्त पाेलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या वेळी कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, आंगण संस्थेच्या संचालिका डाॅ. स्मिता धर्मामेर, प्रयास संस्थेचे संचालक डॉ. विजय राघवन आणि भायखळा जिल्हा महिला कारागृहाच्या अधीक्षक पल्लवी कदम आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 09:25 IST

संबंधित बातम्या