किरण गोसावी अजून एक दिवस तुरुंगातच; तपासासाठी सहकार्य करत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं

क्रूझवरील संपूर्ण कारवाईदरम्यान समीर वानखेडेंसोबत असणारा साक्षीदार किरण गोसावीला पुणे पोलिसांनी फसवणुकीच्या एका गुन्ह्याखाली अटक केली होती.

NCB Witness Kiran Gosavi remanded in police custody for eight days
किरण गोसावीला पुणे पोलिसांनी फसवणुकीच्या एका गुन्ह्याखाली अटक केली आहे.

मुंबईत क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या अटकेत आहे. आर्यन खानवरील कारवाईवरुन सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी आरोपांना सुरुवात केली तेव्हा किरण गोसावी नावाचा उल्लेख केला होता. याशिवाय आर्यन खान सोबत सेल्फी काढल्यामुळेही तो चर्चेत होता.

क्रूझवरील संपूर्ण कारवाईदरम्यान समीर वानखेडेंसोबत असणारा साक्षीदार किरण गोसावीला पुणे पोलिसांनी फसवणुकीच्या एका गुन्ह्याखाली अटक केली होती. दरम्यान, किरण गोसावीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. आता पुन्हा त्याला आणखी एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आली आहे. न्यायाधीश आर.के.बाफना भळगट यांच्या कोर्टात ही सुनावणी झाली.

फिर्यादीचे वकील राहुल कुलकर्णी युक्तिवाद करताना म्हणाले की,आरोपी किरण गोसावी याच्याकडून तीन लाखांपैकी एक लाख मिळविण्यामध्ये यश आले आहे. तसेच त्याच्याकडे असलेल्या मोबाईलचा पासवर्ड मिळणे आवश्यक आहे. त्यातून आणखी माहिती पुढे येण्यास मदत होईल. तो काही काळ सचिन पाटील या नावानं फिरत होता. मात्र त्याच दरम्यान कुसुम गायकवाड महिलेच्या मदतीने आधार कार्ड बनविण्यात आले आहे. या प्रकरणात तिचा देखील समावेश आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाकरिता तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलीस करत होते. तसेच आरोपी किरण गोसावी हा तपासात कोणत्याही प्रकारचं सहकार्य करीत नाही. यामुळे पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी करण्यात आली. गोसावीवरील आरोप खोडून काढण्याचे प्रयत्नही झाले. मात्र अखेर न्यायाधीश आर.के.बाफना भळगट यांनी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kiran gosavi police custody extended one day vsk 98 svk

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार