भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कोल्हापुरला जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून, आज पुण्यात आयोजित पत्रकारपरिषदेत त्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली. कोल्हापुर जिल्हाधिकाऱ्यांचा मला या संदर्भात मेसेज आला आहे, असं किरीट सोमय्यांनी सांगितले व माध्यमांसमोरच त्यांनी तो मेसेज वाचून दाखवला.

तसेच, पत्रकारपरिषदेत बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, “महालक्ष्मी माता, अंबाबाईचं दर्शन घेऊन साडेबारा वाजता ज्या मुरगुड नगरपरिषदेने मला आजीवन प्रतिबंध लादला आहे. त्या ठिकाणी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये हसन मुश्रीफ यांच्या तिसऱ्या घोटाळ्यासह तिन्ही घोटाळ्यांची तक्रार दाखल करणार आहे. माझ्या मनात केवळ एक नवीन भीती निर्माण झालेली आहे, अगोदर मी घोटाळे बाहेर काढायचो तर ठाकरे सरकारचे मंत्री आणि नेते गायब व्हायचे. अनिल देशमुख गायब झाले, सरनाईक सहा महिने गायब होते. परमबीर सिंग गायब आहेत. आता महाराष्ट्रात ठाकरे-पवारांनी एक नवीन पेटंट सुरू केला आहे. किरीट सोमय्याने घोटाळा काढला की रुग्णालयात दाखल व्हायचं. मी घोटाळा बाहेर काढल्यानंतर हसन मुश्रीफ शरद पवारांना भेटायला गेले आणि तिथे रुग्णालयात दाखल झाले.आंनदराव अडसूळांचा घोटाळा बाहेर काढला ते रुग्णालयात दाखल झाले. मला काळजी अशी आहे की उद्या मी हसन मुश्रीफांचा जो घोटाळा बाहेर काढणार आहे, तो घोटाळा ती पेटंट ठाकरे सरकारच्या बारा मंत्र्यांनी अंगीकारली आहे. तर मला भीती अशी आहे की उद्या हा घोटाळा काढल्यानंतर बारा मंत्र्यांचं काय होणार? आणि त्यापैकी कितीजण रुग्णालयात दाखल होणार.”

तसेच, “ मला कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचा निरोप आला आहे की, आता किरीट सोमय्यांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. अशी माझी खात्री झालेली आहे. त्या अर्थी मी राहुल रेखावार किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदीबाबतचा इकडील पारीत केलेला आदेश, या आदेशाद्वारे विखंडीत करीत आहे.” हा मेसेज पत्रकारपरिषदेत किरीट सोमय्या यांनी वाचून दाखवला.

याचबरोबर, “ माझा उद्धव ठाकरेंना थेट प्रश्न आहे, जो मागील आठवड्यात कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला होता. त्यामध्ये लिहिलं होतं. की गनिमी काव्याने किरीट सोमय्यांच्या सुरक्षेत हल्ला होऊ शकतो आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अडचण होणार, म्हणून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश बंदी. मग त्या गनिमी काव्याच्या लोकांची अटक झाली की नाही. तो गनिमी कावा कोणी केला होता? जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात लिहिलं होतं. की हसन मुश्रीफ यांच्या सत्कारासाठी, सन्मानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्याप्रमाणावर कार्यक्रम आयोजित केले आहेत आणि त्यातले काहीजण हे किरीट सोमय्यांची हत्या करू शकतात. मग ही जर तुमच्याकडे माहिती आहे, होती ज्यामुळे तुम्ही माझा कोल्हापूर प्रवेश बंदीचा निर्णय घेतला. त्याबाबत तुम्ही पुढे कारवाई काय केली? ” असं किरीट सोमय्या यांनी पत्रकापरिषदेतून यावेळी विचारलं.

आनंदराव अडसूळ,संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांच्याकडून थोडं शिका : किरीट सोमय्या

मिलिंद नार्वेकर यांनी आपला बांगला स्वतः पाडला,संजय राऊत यांनी 55 लाख रुपये इडीकडे जाऊन देऊन आले.चोरी का माल वापस कर दिया, त्यामुळे किमान या दोघांकडून तरी आनंदराव अडसुळ यांनी शिकवं.जर त्यांनी 900 कोटी रुपये ठेवीदारांचे पैसे परत केल्यास,केस मागे घेण्याबाबत विचारू करू असे संकेत किरीट सोमय्या यांनी दिले.