scorecardresearch

‘किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव’ २० जानेवारीपासून, भरड धान्य विषयाला वाहिलेला देशातील पहिला महोत्सव

पर्यावरण जतन आणि संवर्धनाविषयी जनजागृती करणारा ‘किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव’ येत्या २० ते २३ जानेवारी या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे.

‘किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव’ २० जानेवारीपासून, भरड धान्य विषयाला वाहिलेला देशातील पहिला महोत्सव
संग्रहित छायाचित्र

पुणे : पर्यावरण जतन आणि संवर्धनाविषयी जनजागृती करणारा ‘किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव’ येत्या २० ते २३ जानेवारी या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. भारताच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव हा या विषयाला वाहिलेला देशातील पहिला महोत्सव असून ‘सकस अन्न, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज’ हा या महोत्सवाचा विषय आहे.

महोत्सवांतर्गत पाँडिचेरीच्या ऑरोविल येथील सॉलिट्यूड फार्म आणि ऑरगॅनिक किचनचे संस्थापक कृष्णा मॅकेन्झी यांना यंदाचा वसुंधरा सन्मान जाहीर झाला आहे. भूज येथील पर्यावरण पत्रकार आणि वन्यजीव छायाचित्रकार रोनक गज्जर यांना पर्यावरण पत्रकारिता सन्मान, तर ‘डी. डब्ल्यू. इको इंडिया’ या पर्यावरणविषयक दृक-श्राव्य नियतकालिकाला फिल्ममेकर पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती महोत्सवाच्या निमंत्रक आरती किर्लोस्कर आणि महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा – पुणेकरांचे १९३ कोटी ‘खड्ड्यात’? महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा निधी वापरून रस्ते दुरुस्तीचा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक गौरी किर्लोस्कर, महोत्सवाचे अध्यक्ष राजेंद्र देशपांडे, ‘फॅसिलीटेटर’ आनंद चितळे, क्युरेटर डॉ. गुरुदास नूलकर यांच्या हस्ते महोत्सवाच्या बोधचिन्हाचेही अनावरण करण्यात आले. हा महोत्सव विनामुल्य प्रदर्शित केला जाणार असून bit.ly/kviff23 या लिंकद्वारे नावनोंदणी करणे बंधनकारक आहे, असे किर्लोस्कर यांनी सांगितले.

महोत्सवाची वैशिष्ट्ये

  • भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ ते दुपारी २.३० या वेळेत महोत्सवाचे प्रक्षेपण
  • सायंकाळी ७ ते रात्री १०.३० या वेळेत पुनर्प्रक्षेपण
  • शंभराहून अधिक लघुपट, माहितीपटांचे प्रदर्शन
  • तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्रे, निसर्गसंवाद, दृक-श्राव्य व्याख्याने
  • ‘मनमोहक भारत’ विषयावरील ऑनलाइन छायाचित्र प्रदर्शन

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 12:24 IST

संबंधित बातम्या