पुणे प्रतिनिधी : पुणे शहराच्या कोंढवा भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीवर विवाह करण्याचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये अनिकेत राकेश निकाळजे (वय २१, रा. एसआरए वसाहत, कमेला, कोंढवा) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पोलीसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन युवतीची आणि आरोपी अनिकेत निकाळजे याची काही महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. सुरुवातीला मैत्री आणि नंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आरोपी अनिकेत निकाळजे याने पीडित तरुणीला विवाहाचे अमिष दाखवून वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले.

पीडित तरुणीने जेव्हा विवाहाबद्दल विचारणा केली, तेव्हा आरोपीने तिला उडवाउडवीची उत्तरे दिली आणि त्यानंतर धमकावले. पीडित तरुणीने कोंढवा पोलीसांकडे तक्रार दाखल करताच, अनिकेत निकाळजे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला तत्काळ अटक करण्यात आली, असे कोंढवा पोलीसांनी सांगीतले.