सोसायटीच्या आवारातून सायकल चोरी ; चोरट्याला पकडले;  नऊ सायकली जप्त

चोरट्याने कोंढवा, मुंढवा आणि वानवडी परिसरातून सायकल चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

पुणे : सोसायटीच्या आवारातून सायकल चोरणाऱ्या चोरट्याला कोंढवा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक लाख दहा हजार रुपये किमतीच्या नऊ सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. चोरट्याने कोंढवा, मुंढवा आणि वानवडी परिसरातून सायकल चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

रज्जाक सादर रज्जाक शेख (वय ५१, रा. कोंढवा, मूळ रा. रामपूर, जि. गाझीयाबाद, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जारा शोएब खान (वय ३३, रा. साळुंखे विहार) यांनी फिर्याद दिली आहे. खान यांच्या लहान मुलाने त्याची सायकल सोसायटीच्या आवारात लावली होती. त्यानंतर खान कुटुंबासह दुबईला गेल्या होत्या. खान यांच्या मुलाची सायकल चोरीला गेली. दुबईहून नुकतेच खान कुटुंबिय परतले. तेव्हा मुलाची सायकल चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे चोरट्याचा माग काढण्यात आला. शेखने सायकल चोरीचे गुन्हे केल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी जोतिबा पवार आणि सतीश चव्हाण यांना मिळाली. त्यानंतर शेखला सापळा लावून ताब्यात घेण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kondhwa police arrested thief who stole bicycle from the society premises pune print news zws

Next Story
पुण्यात लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान
फोटो गॅलरी