feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पुणे : हापूस म्हणजे कोकणातला.. आकार, चव आणि रंगांनेही आम्रप्रेमींना आकर्षित करणारा.. मात्र येत्या काळात टोमॅटोनगरी नारायणगाव आणि भाज्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या जुन्नरमधील आंबा देखील हापूस म्हणून ओळखला जाण्याची शक्यता आहे. उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय खेड यांच्या पुढाकाराने कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव आणि जुन्नर, आंबेगावमधील पंधरा शेतकऱ्यांच्या वतीने जुन्नर, आंबेगाव परिसरातील हापूस आंब्यासाठी ‘शिवनेरी हापूस’ म्हणून भौगोलिक मानांकन मिळावे, यासाठी चेन्नई येथील कार्यालयाकडे अर्ज दाखल केला आहे. मात्र, या अर्जावरून ‘शिवनेरी हापूस’ आणि ‘कोकण हापूस’ आमने-सामने आले आहेत.

जुन्नर-आंबेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार  शेतकऱ्यांनी ‘शिवनेरी हापूस’च्या भौगोलिक मानांकनासाठी अर्ज केला आहे. त्यासाठी शास्त्रीय आधार म्हणून पुण्याची आघारकर संशोधन संस्था आणि राष्ट्रीय शेती आणि अन्न विश्लेषण आणि संशोधन संस्था (नाफारी) या संस्थेकडून देवगड (जि. सिंधुदुर्ग) येथील माती, पाणी, आंब्याची पाने, आंबे आणि जुन्नर-आंबेगाव येथील हापूस आंबा यांचे तुलनात्मक शास्त्रीय विश्लेषण करून संबंधित माहिती अर्जासोबत जोडली आहे. आम्ही जोडलेली कागदपत्रे मानांकन मिळण्यासाठी सक्षम आहेत, अशी माहिती खेड येथील उपविभागीय कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी दिली आहे.

कायदेशीर लढाई शक्य..

हापूस ही कोकणची मूळ ओळख आहे. कोकण हापूसला ऐतिहासिक, शास्त्रीय आधार आहे. आता हापूसचे मानांकन अन्य कुणाला घेता येणार नाही. या बाबत कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कायदेशीर लढाई लढू, अशी माहिती कोकण हापूस उत्पादक आणि उत्पादक विक्री सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांनी दिली.

थोडी माहिती.. 

दापोली कृषी विद्यापीठातून पंधरा वर्षांपूर्वी हापूसची कलमे आफ्रिकेतील मालावी देशाला निर्यात करण्यात आली. तिथे उत्पादित आंबा मालावी हापूस म्हणून डिसेंबर २०१७-२०१८ मध्ये भारतीय बाजारात दाखल झाला. त्याचा परिणाम म्हणून कोकणच्या हापूसला आर्थिक फटका बसू लागला. त्यामुळे कोकणातून झालेल्या विरोधानंतर मालावी आंबा, हे नाव बदलण्यात आले. त्याला हापूस म्हटले जात नाही.

वेगळे गुणधर्म असल्यास..

इतिहास, शास्त्र आणि भौगोलिक आधारावर जीआय मानांकन मिळते. त्यासाठी शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या संस्थांनी अर्ज करावा लागतो. तांत्रिकदृष्टय़ा सरकारी संस्थेला अर्ज करता येत नाही. कोकण हापूसपेक्षा वेगळे गुणधर्म असल्याचे जुन्नर-आंबेगावकरांनी शास्त्रीय आधारावर सिद्ध करून दाखविल्यास, तसे ऐतिहासिक पुरावे दिल्यास शिवनेरी हापूसला जीआय मानांकन मिळू शकते, असे जीआय तज्ज्ञ अ‍ॅड. गणेश हिंगमिरे यांनी सांगितले.