scorecardresearch

कोथरूडमध्ये निलेश घायवळ टोळीतील फरारी गुंडाला पकडले

कोथरूडमधील गुंड निलेश घायवळ टोळीतील फरारी गुंडास गुन्हे शाखेने पकडले.

man-arrested-1
(प्रातिनिधिक छायाचित्र)

कोथरूडमधील गुंड निलेश घायवळ टोळीतील फरारी गुंडास गुन्हे शाखेने पकडले. गुंडा विरोधात मोक्का कारवाई करण्यात आल्यानंतर तो पसार झाला होता.

समीर बाळू खेंगरे (वय २४, रा. आशिष गार्डन चौक, कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. खेंगरे कोथरूडमधील गुंड निलेश घायवळचा साथीदार आहे. खेंगरे विरोधात कोथरुड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. कारवाई केल्यानंतर तो पसार झाला होता. त्याचा पोलिसांकडून माग काढण्यात येत होता.
गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलीस निरीक्षक अनिता मोरे आणि पथक कोथरुड परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी कर्वे पुतळ्याजवळ खेंगरे थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी राकेश टेकावडे यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून त्याला पकडण्यात आले. खेंगरे कोथरूड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. फरारी झाल्यानंतर खेंगरेने आणखी काही गुन्हे केले आहेत का?, यादृष्टीने तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक अनिता मोरे, उपनिरीक्षक तेजस्वी पवार, महेश निंबाळकर, संतोष क्षीरसागर, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, संजीव कळंबे, सोनम नेवसे आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kothrud nilesh ghaiwal caught gang fugitive gangsters crime branch inspector of police amy

ताज्या बातम्या