पुणे : कोंढव्यात कोयता गँगची दहशत; वैमनस्यातून तरुणावर वार

या प्रकरणी पोलिसांनी पवन रवींद्र राठोड (वय २३, रा. साईनगर, कोंढवा) याला अटक केली आहे.

crime
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पिडीता आणि साक्षीदार फितूर होऊनही आरोपीला २५ वर्षे सक्तमजुरी(प्रातिनिधिक फोटो-लोकसत्ता)

पुणे : शहरात कोयता गँगकडून दहशत माजविण्याचे सत्र कायम आहे. पूर्ववैमनस्यातून टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करुन दहशत माजविल्याची घटना कोंढवा भागात घडली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला नागरिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा टोळक्याने कोयते उगारुन नागरिकांना धमकावल्याचे उघडकीस आले आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हेही वाचा >>> पुणे: राज्य सरकारने मुद्रांक शुल्क दरात कपात करावी; क्रेडाई पुणे मेट्रोची मागणी

या प्रकरणी पोलिसांनी पवन रवींद्र राठोड (वय २३, रा. साईनगर, कोंढवा) याला अटक केली आहे. मंगेश माने याच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राेहित खंडाळे (वय २४, रा. कोंढवा बुद्रुक) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. खंडाळे याने या संदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहितचा मित्र वैभव साळवे याची आरोपी राठोड आणि साथीदारांशी भांडणे झाली होती. रोहित वैभव साळवे याच्याबरोबर फिरायचा. त्यामुळे आरोपी त्याच्यावर चिडून होते. रोहितला कोंढवा परिसरात गाठले. आमच्या दुश्मनाबरोबर फिरतो का?, अशी विचारणा करुन आरोपींनी रोहितला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्या वेळी नागरिकांनी रोहितला मदत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी नागरिकांवर कोयता उगारुन दहशत माजविली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेला आरोपी पवन राठोडला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 11:11 IST
Next Story
शिवाजीनगर करोना काळजी केंद्रातील गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करा, किरीट सोमय्या यांची मागणी
Exit mobile version