लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: विवाह समारंभात झालेल्या वादातून तरुणावर कोयत्याने वार करून उपहारगृहाची तोडफोड केल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे भागात घडली.

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Ajit Pawar gave a public confession Said Hooliganism in the industrial area
अजित पवारांनी दिली जाहीर कबुली; म्हणाले, ‘औद्योगिक पट्ट्यात गुंडगिरी…’
On the occasion of Prime Minister Narendra Modi visit to Kanhan Nagpur police force on high alert mode Nagpur
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा: नागपूर पोलीस ‘हाय अलर्ट मोड’वर; वाहतुक बदल जाणून घ्या…
Senas Chandrahar Patil summoned to Mumbai immediately
सेनेच्या चंद्रहार पाटलांना तातडीने मुंबईला पाचारण

या प्रकरणी करण जांभळे, गणेश खांडेकर, मोन्या सुर्वे, मयूर परब, अक्षय बारगजे यांच्यासह दोन ते तीन जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर दिलीप लोखंडे (वय ३२, रा. कृष्णकुंज, स्वामी नारायण मंदिरामागे, नऱ्हे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा… भाजप कार्यकारिणी बैठकीची ‘शाळा’

सागर यांचा मित्र ऋषिकेश याच्या विवाह समारंभात आरोपींशी किरकोळ कारणावरुन आरोपी मोन्या सुर्वे याच्याशी वाद झाला होता. त्यानंतर सागर आणि मित्र ऋषीकेश रात्री नऱ्हे परिसरातील व्हीआर कॅफेत जेवण करण्यासाठी गेले होते. त्या वेळी आरोपी मोन्या सुर्वे आणि साथीदार तेथे आले. त्यांनी उपहारगृहात कोयते उगारुन दहशत माजविली. सागर याच्या मनगटावर कोयत्याने वार केला. उपहारगृहातील खुर्च्याची तोडफोड, तसेच दगडफेक करून आरोपी पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक यादव तपास करत आहेत.