scorecardresearch

Premium

पुणे: संगमवाडीत कोयता गॅंगची दहशत; बिअरच्या बाटल्या रस्त्यात फोडून आणि कोयते उगारुन नागरिकांना धमकी

या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून दहशत माजविणाऱ्या तरुणांचा शोध घेण्यात येत आहे.

pune koyta gang terror beer bottle
पुणे संगमवाडीत कोयता गॅंगची दहशत; बिअरच्या बाटल्या रस्त्यात फोडून आणि कोयते उगारुन नागरिकांना धमकी (प्रतिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: शिवाजीनगरहून संगमवाडी रस्त्यावर गुंडांच्या टोळक्याने दहशत माजविल्याची घटना घडली. कोयते उगारुन दहशत माजविण्यात काही स्थानिक तरुण सामील असल्याने भयभीत झालेल्या नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली नाही. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून दहशत माजविणाऱ्या तरुणांचा शोध घेण्यात येत आहे.

Koyta gang in police trap
पुणे : ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांमुळे कोयता गॅंग पोलिसांच्या जाळ्यात
haj Pilgrims
हजयात्रेकरूंना त्यांचे पैसे परत मिळणार! ‘हे’ आहेत आदेश…
pune gangsters interrogated at police commissionerate
पोलिसांनी पुण्यातील ‘भाईं’चा नक्षा उतरविला… गज्या मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळसह ३०० गुंडांची पोलीस आयु्क्तालयात चौकशी
Bhandara Chestnut-shouldered Petronia hunting and selling illegal Pawni Forest Department poachers arrest
भंडारा : धक्कादायक! पिवळ्या कंठाच्या तब्बल २८४ चिमण्यांची शिकार; अवैध विक्री पूर्वी…

येरवड्यातील संगमवाडी परिसरात तरुणांच्या दोनगटात वाद झाल्याने हाणामारी झाली. एका गटाने साथीदारांना बोलावून घेतले. दुचाकीवरुन आलेल्या टोळक्याने बिअरच्या बाटल्या रस्त्यात फोडल्या तसेच कोयते उगारुन दहशत माजविली. काही स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, टोळक्याने नागरिकांना धमकावले.

हेही वाचा… पुणे: ‘एलबीटी’प्रकरणातून मिळणाऱ्या कोट्यवधींच्या महसुलाकडे महापालिकेचे सात वर्षांपासून दुर्लक्ष

या घटनेचे चित्रीकरण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केले. सीसीटीव्ही चित्रीकरण समाजमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. दहशत माजविण्यात काही स्थानिक तरुण सामील असल्याने पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. सामोपचाराने हाणामारीचे प्रकरण मिटवण्यात आल्याची माहिती रहिवाशांनी दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Koyta gang threatens citizens by breaking beer bottles on the road and raising koyta in sangamwadi pune pune print news rbk 25 dvr

First published on: 19-04-2023 at 13:52 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×