scorecardresearch

पुणे : ट्रकसह खाणीत पडून मजुराचा मृत्यू; दारुच्या नशेत ट्रकचा चालविताना दुर्घटना

ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक खाणीत कोसळल्याने उराव याचा मृत्यू झाला,

dead-body
प्रतिनिधिक छायाचित्र : लोकसत्ता टीम

हवेली तालुक्यातील भावडी गावात खाणीत ट्रक पडून मजुराचा मृत्यू झाला. मजुराला ट्रक चालविता येत नव्हता. दारुच्या नशेत त्याने ट्रकचा ताबा घेतल्याने अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अर्जुन बाबुराव उराव (वय ३६, सध्या रा. श्री गणेश मेटल, भावडी, ता. हवेली, जि. पुणे, मूळ रा. बारीखाय, झारखंड) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई सागर दळे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>> पुणे : खेड तालुक्यात बिबट्याचा हल्ल्यात बारावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

उराव मजुरी करतो. भावडी गाव परिसरात खाणीजवळ ट्रक लावण्यात आला होता. उराव याला दारु पिण्याचे व्यसन आहे. त्याने काेणाला न सांगता ट्रक सुरू केला. उरावला ट्रक चालवित येत नव्हता. ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक खाणीत कोसळल्याने उराव याचा मृत्यू झाला, असे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे यांनी सांगितले. उपनिरीक्षक टेमगिरे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 15:29 IST