Ladki Bahin Yojana : पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातील महिला वर्गाकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून १ कोटींहून अधिक महिलांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. दुसर्या बाजूला विरोधकांनी या योजनेवरुन टीका करण्यास सुरुवात केली. तर ही योजना राज्यातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचली पाहिजे.त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात येत आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडून लावण्यात आलेल्या बॅनरमुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर दोन महिलांचे फोटो आहेत. त्या महिलांची कोणत्याही प्रकारे परवानगी न घेता,फोटो बॅनरवर लावण्यात आले आहे.यामुळे संबधित महिलांनी पुणे पोलिसांकडे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात लेखी तक्रार केली आहे. हेही वाचा.मावळ विधानसभेवर भाजपच्या दाव्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केली नाराजी म्हणाले… मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर फोटो लावण्यात आला आहे. याबाबत कोणतीही परवानगी न घेता,फोटो लावण्यात आले आहे.यामुळे आमच्या कुटुंबात गैरसमज आणि वादाला सुरुवात झाली आहे.यामुळे मला न्याय मिळावा,अशी लेखी तक्रार पुणे पोलिस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्याकडे केली आहे.यामुळे पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. हेही वाचा.विश्लेषण: पुण्यात खडकवासला धरणाच्या बाबतीत नेमके काय घडले? धरणांतून विसर्ग कसा करतात? या प्रकाराबाबत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की,सोशल मीडियावर जो फोटो व्हायरल होत आहे. तो २०१६ या वर्षातील आहे.आम्ही तो फोटो एका एजन्सीच्या माध्यमातुन विकत घेतलेला आहे. याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच वापरला आहे.जर त्या महिलांना काही वाटले असल्यास दिलगिरी व्यक्त करतो,अशी भूमिका त्यांनी मांडली.