महसूल कर भरा आता ऑनलाइन ; पुणे जिल्ह्यातील ३१४ गावांची निवड | Land records department is also preparing to provide online payment facility of revenue tax pune print news psg 17 amy 95 | Loksatta

महसूल कर भरा आता ऑनलाइन ; पुणे जिल्ह्यातील ३१४ गावांची निवड

महापालिकेच्या मिळकत कराच्या (प्रॉपर्टी टॅक्स) धर्तीवर आता जमीन विषयक महसूल कर अर्थात शेतसारा देखील ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी भूमी अभिलेख विभागाने सुरू केली आहे.

tax
महसूल कर भरा आता ऑनलाइन(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

महापालिकेच्या मिळकत कराच्या (प्रॉपर्टी टॅक्स) धर्तीवर आता जमीन विषयक महसूल कर अर्थात शेतसारा देखील ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी भूमी अभिलेख विभागाने सुरू केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील सुमारे ३१४ गावांची निवड करण्यात आली असून गाव नमुन्याचे विदा भरण्याचे (डाटा एण्ट्री) करण्याची काम सुरू आहे. शेतसारा भरण्याची ऑनलाइन नोटीस बजावली जाणार असून ऑनलाइन कर भरता येणार आहे.

हेही वाचा >>>पोटनिवडणुकीसाठी आघाडीत एकीचे प्रयत्न; कसबा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

शेतसारा हा पारंपरिक कर आहे. इंग्रजांच्या काळापासून जमिनींवर कर लावण्यास सुरुवात झाली. पूर्वी शेतसारा हा महसूल देणारा महत्त्वाचा कर होता. कालांतराने जशी प्रगती होत गेली, तसे नव-नव्या करांची आकारणी सुरू झाली. मात्र, जमिनींवर आकारल्या जाणाऱ्या या कराची वसुली आजही सुरू आहे. जमिनीच्या क्षेत्रानुसार या कराची अंमलबजावणी होते. शेतीचा कर हा अल्प असल्याने या कराची वसुली अपेक्षित प्रमाणे होत नाही. थकबाकीची रक्कम मोठी झाल्यावर हा कर मोठा वाढतो. थकबाकीची रक्कम ही तलाठी कार्यालयात गेल्यावरच कळते. तसेच आता घरबसल्या ऑनलाइन सातबारा उतारा असल्याने तलाठी कार्यालयात सुद्धा नागरिकांना जावे लागत नाही. त्यामुळे हा कर वसूल होत नाही.

हेही वाचा >>>मुंबईसाठी महानंद गरजेचेच! हक्काची बाजारपेठ गमावण्याची भीती

या पार्श्वभूमीवर आता भूमी अभिलेख विभागाने ई-चावडी या संगणक प्रणालीमध्येच शेतीचा कर ऑनलाइन भरण्याची सुविधा देण्यासाठी काम सुरू केले आहे. त्यासाठी संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात किंवा महसूल विभागात रजिस्टर नमुना लिहिण्याची पद्धत वेगळी आहे. या ठिकाणी आलेल्या अडचणी सोडवून संगणक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. या गावांमध्ये प्रामुख्याने शेतीचा कर आकारण्यात आला. या लहान गावांमध्ये अकृषिक (एनए) जमिनी नसल्याने आता शहरालगतची गावे निवडून एनए कर सुद्धा आकारण्याच्या पर्यायाची चाचपणी केली जात आहे. यासाठी तलाठ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येत आहे.

हेही वाचा >>>चार वर्षांची पदवी जूनपासून, अभ्यासक्रमाचा मात्र पत्ताच नाही! ; आराखडय़ासाठी फेब्रुवारीअखेपर्यंत मुदत

शेतसारा ऑनलाइन भरण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील सुमारे ३१४ गावांची निवड करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत गाव नमुन्याची माहिती संगणक प्रणालीमध्ये भरण्याचे काम सुरू आहे. या सुविधेमुळे सर्वेक्षण क्रमांक निहाय किंवा खातेदारनिहाय वार्षिक शेतसाऱ्याची रक्कम किती होत आहे, थकीत कर किती आहे, याची माहिती संगणकावर मिळणार असून कर ऑनलाइन भरता येणार आहे.- संजय तेली, उपजिल्हाधिकारी, कुळ कायदा शाखा

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 10:34 IST
Next Story
पुणे: बाल सुधारगृहातून पसार झालेली कोयता गँगमधील दोन अल्पवयीन मुले ताब्यात; पाच जण अद्याप फरार