पुणे : खंडाळा घाटात मध्य रेल्वेच्या मिडल लाईनवर दरड कोसळल्याची घटना घडली होती. पहाटे दोन च्या सुमारास बॅटरी हिल येथे माती आणि काही दगड रेल्वे लाईनवर आल्याने संबंधित लाईन बंद प्रभावित झाली होती. घाटातील अप लाईन आणि डाऊन लाईन सुरू असल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली नाही.

खंडाळा घाटातील मध्य रेल्वेच्या मिडल लाईनवर दरड कोसळली. दरड आणि माती युद्धपातळीवर काढल्याने रेल्वे सेवेवर फार काही परिणाम दिसला नाही. बॅटरी हिल येथील किलोमीटर १२०/१२१ दरम्यान, रेल्वे रुळावर काही प्रमाणात माती आणि दरड कोसळली होती.

हेही वाचा…केंद्रीय हवाई राज्यमत्र्यांच्या पुण्यातील विमानतळच नापास!

यामुळं काही वेळ मिडल लाईन बंद पडली होती. परंतु, घाटातील रेल्वेची अप लाईन आणि डाऊन लाईन सुरू असल्याने रेल्वेसेवा प्रभावित झाली नाही. सकाळी सहा च्या सुमारास दरड आणि माती बाजूला करण्यात रेल्वे प्रश्नाला यश आले आहे. रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे.