गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे काल निधन झालं. करोना आणि त्यानंतर झालेली न्यूमोनियाची लागण यामुळे त्या गेल्या जवळपास महिन्याभरापासून मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होत्या. ९२ वर्षीय लता मंगेशकर यांच्या जाण्याने देशभरातून दुःख व्यक्त केलं जात आहे. राज्य सरकारने आज सार्वजनिक सुट्टी दिली असून देशात दोन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मंगेशकर कुटुंबियांद्वारे उभारण्यात आलेल्या पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातही लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानिमित्त आज म्हणजेच सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी बाह्य रुग्ण विभागातल्या एकाही रुग्णाकडून तपासणी फी घेतली गेली नाही. सर्व रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. रुग्णालयाच्या प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे. हे रुग्णालय मंगेशकर मेडिकल फाऊंडेशनतर्फे चालवण्यात येत आहे.

Ranajagjitsinha Patil - Om Rajenimbalkar
“…तर राजकारण सोडून देईन”, ओमराजेंनी तेरणा महाविद्यालयावरून केलेल्या आरोपांवर राणा पाटलाचं उत्तर
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
Pune, delivery boy Arrested, Stealing Electronics, laptop, mobile, warje, sinhagad road, Student, Flat, Valuables, Rs 4 Lakh, smart watch, Seized, crime news, police, marathi news,
पुणे : विद्यार्थ्यांचे लॅपटॉप चोरणारा डिलिव्हरी बॉय अटकेत; नऊ लॅपटॉप, मोबाइल, दुचाकी जप्त

१९८९ मध्ये लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खडीकर आणि हृदयनाथ मंगेशकर या पाच भावंडांनी लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनची स्थापना केली. फाउंडेशनने नंतर एरंडवणे येथे म्हात्रे पुलाजवळ एक रुग्णालय बांधले. त्या रुग्णालयाला या भावंडांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचं नाव देण्यात आलं. लता मंगेशकर या हॉस्पिटलच्या कामात, डिझाइनपासून ते इतर किरकोळ समस्यांपर्यंत उत्सुकतेने सहभागी होत असत. भेदभाव न करता रुग्णांना परवडणाऱ्या किमतीत उच्च गुणवत्तेच्या नैतिक वैद्यकीय सेवा प्रदान करणे हे कुटुंबाचे ध्येय होते.