दिवंगत आमदारांच्या पत्नी पाठोपाठ बंधू शंकर जगतापांनी घेतला उमेदवारी अर्ज, पिंपरी-चिंचवड शहरात राजकिय घडामोडींना वेग | Late MLA Laxman Jagtap brother Shankar Jagtap took the nomination form political news kjp 91 ysh 95 | Loksatta

‘अश्विनी जगताप’ की ‘शंकर जगताप’? लक्ष्मण जगतापांच्या पत्नी पाठोपाठ बंधू शंकर जगतापांनी घेतला उमेदवारी अर्ज

अश्विनी जगताप आणि शंकर जगताप दोघांची नावे ही उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात राजकिय घडामोडींना वेग…

Late MLAs Laxman Jagtap Ashwini Jagtap and Shankar Jagtap
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप अश्विनी जगताप आणि शंकर जगताप

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या पाठोपाठ आमदारांचे बंधू शंकर जगताप यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतला आहे. दोघांची नावे ही उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. अश्विनी जगताप आणि शंकर जगताप पैकी एकाला भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, दोघांनी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याने भाजपा पक्षश्रेष्ठी कोणाला एबी फॉर्म देणार हे देखील तितकंच महत्वाचे आहे. तसेच, २०१९ मध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार राहुल कलाटे यांनी देखील अर्ज घेतला आहे. पक्ष विरहित अर्ज घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >>> दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या पत्नीने घेतला उमेदवारी अर्ज; भाजपाकडून अधिकृत उमेदवार असण्याची शक्यता! 

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक संदर्भात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील बंधू शंकर जगताप आणि दिवंगत आमदारांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले होते. जगताप कुटुंबासोबत त्यांनी बंद दाराआड चर्चा देखील केली होती. परंतु, ती चर्चा राजकीय नव्हती, कौटुंबिक भेट देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे शंकर जगताप यांनी सांगितले होते. भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असलेल्या अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांनी उमेदवारी अर्ज आणल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.भाजपा पक्षश्रेष्ठी याकडे कसे पहाते आणि कोणाला एबी फॉर्म देऊन अधिकृत उमेदवार करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अद्याप महाविकास आघाडीचे चित्र अस्पष्ट आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 15:34 IST
Next Story
अरबी समुद्रात स्मारक करण्याचा बेशरमपणा करू नये; संभाजी भिडे गुरुजी यांची टिप्पणी