ओल्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या पर्यावरणपूरक बायोसीएनजीवर (सीबीजी) पीएमपीच्या दोन गाड्या धावणार आहेत. सिटी वेस्ट टू सिटी बस या उपक्रमाअंतर्गत निगडी ते लोणावळा या मार्गावर या गाड्या धावणार आहेत. टप्प्याटप्प्याने दैनंदिन सुमारे १०० गाड्या बायोसीएनजीवर धावतील, असा दावा पीएमपी आणि महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ओल्या कचऱ्यापासून इंधन निर्मीतीचा प्रकल्प सुस रस्ता येथे उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या सीबीजी इंधनापासून पीएमपीच्या गाड्या चालविण्याचे नियोजित होते. त्यानुसार या उपक्रमाला महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॅा. कुणाल खेमनार आणि रवींद्र बिनवडे यांच्यासह पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या उपस्थित प्रारंभ झाला. पीएमपी, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, मे. नोबेल एक्स्चेंज यांच्या संयुक्त विद्यमानाने सिटी वेस्ट टू सिटी बस हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

नोबल एक्सचेंज या कंपनीद्वारे संकलीत केलेल्या ओल्या कचऱ्यापासून बायोसीएनजी तयार केला जात आहे. तो इंडियन ऑईल यांच्या रिटेल पंपावरून पीएमपीच्या सीएनजी गाड्यांमध्ये भरला जाणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय यांच्या सस्टेनेबल टूवर्डस ॲफोर्डेबल ट्रान्स्पोर्टेशन या योजनेखाली इंडियन ऑईल कंपनी भागीदार आहे. त्यामुळे दररोज एक हजार किलो बायोसीएनजी तयार करून तो सोमाटणे फाया येथे पीएमपीच्या सीएनजी गाड्यांध्ये भरला जाणार आहे. बायोसीएनजीवर धावणाऱ्या गाड्यांची चाचणी टाटा मोटर्स, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन इंडिया, व्हेईकल ॲन्ड रिसर्च डेव्हलमेंट एस्टॅब्लिशमेंट यांनी केली आहे. सध्या निगडी ते लोणावळा या मार्गावर दोन गाड्या धावणार आहेत.