ओल्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या पर्यावरणपूरक बायोसीएनजीवर (सीबीजी) पीएमपीच्या दोन गाड्या धावणार आहेत. सिटी वेस्ट टू सिटी बस या उपक्रमाअंतर्गत निगडी ते लोणावळा या मार्गावर या गाड्या धावणार आहेत. टप्प्याटप्प्याने दैनंदिन सुमारे १०० गाड्या बायोसीएनजीवर धावतील, असा दावा पीएमपी आणि महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ओल्या कचऱ्यापासून इंधन निर्मीतीचा प्रकल्प सुस रस्ता येथे उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या सीबीजी इंधनापासून पीएमपीच्या गाड्या चालविण्याचे नियोजित होते. त्यानुसार या उपक्रमाला महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॅा. कुणाल खेमनार आणि रवींद्र बिनवडे यांच्यासह पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या उपस्थित प्रारंभ झाला. पीएमपी, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, मे. नोबेल एक्स्चेंज यांच्या संयुक्त विद्यमानाने सिटी वेस्ट टू सिटी बस हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Launch of the city west to city bus initiative pmp two buses on biocng pune print news amy
First published on: 01-07-2022 at 18:25 IST